अभिनेत्री रेखा: बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्याकडे ४०० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांच्या संपत्तीचा वारसदार कोण, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अभिनेत्री रेखांच्या संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल शॉक, ३२ वर्षांपासून सोबत असणाऱ्या मॅनेजरला किती कोटी मिळणार?
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून रेखाला ओळखलं जातं. तिने हिंदी चित्रपटांसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या कामाचा जलवा दाखवला आहे. आज १० ऑक्टोबर रोजी तिचा वाढदिवस साजरा केला जातो.
26
रेखाच वय किती आहे?
रेखाच वय ७० असलं तरीही ती आवाज अनेक अभिनेत्रींनवर भारी आहे. तिचे आज लाखो चाहते असून ते तिच्या एका झलकासाठी आजही वेडे झालेले आहेत. ती कायमच तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत राहत असते.
36
अमिताभ बच्चन यांचं रेखावर होतं प्रेम
अमिताभ बच्चन यांचं रेखावर प्रेम होतं. अनेकांना अजूनही दोघ प्रेमात आहेत का अशी शंका वाटतं असते. रेखा यांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक अजूनही उत्सुक असतात.
रेखा यांच्याकडे तब्बल ४०० कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचं सांगण्यात आलं आहे. पतीच्या निधनानंतर रेखा यांनी दुसरं लग्न केलं नाही. त्यांना मुलबाळ नसून त्यांच्यानंतर संपत्ती कोणाला मिळणार हा सर्वांना प्रश्न पडला आहे.
56
रेखा यांच्या संपत्तीची जबाबदारी कोणाकडे आहे?
रेखा यांच्या संपत्तीची जबाबदारी ही त्यांच्या मॅनेजर फरजाना घेणार आहेत. फरजाना या गेल्या 32 वर्षांपासून रेखासोबत आहेत. अगदी सावलीसारख्या त्या रेखाच्या पाठी उभ्या असतात.
66
रेखा यांच्या मॅनेजरला किती पैसे मिळणार?
रेखा यांच्या मॅनेजरला संपत्तीपैकी एक हिस्सा मिळणार असून दुसरा हिस्सा हा ट्रस्टला दिला जाणार आहे. त्यामुळं आता ही संपत्ती नेमकी कोणाला जाणार हे नक्की झालं आहे.