Jhimma 2 Teaser Out : ‘इंदू डार्लिंगच्या 75व्या वाढदिवसासाठी कोण कोण येणार?’, झिम्मा-2 सिनेमा या दिवशी होणार रिलीज

Published : Oct 24, 2023, 07:04 PM ISTUpdated : Oct 24, 2023, 07:15 PM IST
Jhimma 2

सार

Jhimma 2 Teaser Out : बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या ‘झिम्मा’ सिनेमाचा सीक्वेल ‘झिम्मा 2’ सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यासोबतच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतोय? याचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे. 

Jhimma 2 Teaser Out : 'झिम्मा' (Jhimma) या मराठी सिनेमाची वर्ष 2021मध्ये बॉक्सऑफिसवर मोठ्या प्रमाणात जादू पाहायला मिळाली होती. सिनेमाची कथा, गाणी आणि कलाकारांना सिनेरसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. 

प्रेक्षकांचे इतके प्रेम मिळाल्यानंतर आता या सिनेमाचा सीक्वेल ‘झिम्मा 2’ (Jhimma 2 Movie) लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर ‘झिम्मा 2’ सिनेमाचे टीझर शेअर केले आहे.

'झिम्मा-2' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये नेमके काय आहे?

टीझरच्या सुरुवातीस एका रूमची फ्रेम दिसत आहे. यानंतर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर तेथे येतो आणि खुर्चीवर बसून मोबाइलमध्ये मेसेज टाइप करू लागतो.

सिद्धार्थ अशा आशयाचा मेसेज टाइप करत असतो की, ‘देवा लक्ष ठेव हा! बायांनो पुढच्या ट्रीपची तयारी करायला घ्या. कारण आहे इंदू डार्लिंगचा 75वा वाढदिवस. जो तिला आपल्यासोबत सेलिब्रेट करायचा आहे आणि तिच्याकडे एक सरप्राईज आहे. चला! ’

Jhimma 2 Teaser Out Watch Video

सिद्धार्थनं आपल्या आगामी सिनेमाचे टीझर शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आता खेळ सुरू… इंदू डार्लिंगच्या 75व्या वाढदिवसासाठी कोण कोण येणार? लवकरच कळणार…'झिम्मा-2' 24 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात"

‘झिम्मा-2’ सिनेमा येत्या 24 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षक देखील हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

‘झिम्मा’ सिनेमाला मिळालं होते घवघवीत यश

19 नोव्हेंबर 2021ला रिलीज झालेल्या 'झिम्मा' सिनेमानं सिनेरसिकांना अक्षरशः वेड लावलं होतं. हेमंत ढोमे दिग्दर्शित हा सिनेमा सात महिलांच्या अवतीभोवती फिरणारा होता. यातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला. 

सिनेमामध्ये सुहास जोशी (इंदुमती कर्णिक उर्फ इंदू), निर्मिती सावंत (निर्मला कोंडे-पाटील), सोनाली कुलकर्णी (मैथिली देशपांडे) , सिद्धार्थ चांदेकर (कबीर कुलकर्णी), क्षिती जोग (मीता जहागीरदार), सुचित्रा बांधेकर (वैशाली देशपांडे), मृण्मयी गोडबोल (रमा लेले- शहा) आणि सायली संजीव (कृतिका जोशी) यांच्या मुख्य भूमिका होत्या. 

लंडनमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या या महिलांचा प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. हृदयस्पर्शी कहाणीमुळे सिनेमाला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे आता ‘झिम्मा 2’ सिनेमा पाहण्यासाठीही प्रेक्षक आतुर झाले आहेत.

‘झिम्मा 2’ मध्ये दिसणार दोन नवीन चेहरे, सिनेमाचे नवीन पोस्टर रिलीज

झिम्मा 2 सिनेमामध्ये दोन नवीन चेहरे दिसणार आहेत. ते म्हणजे अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू. मोठ्या विश्रांतीनंतर आता शिवानी आणि रिंकू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याने त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

आणखी वाचा

मलायका वयाच्या पन्नाशीतही दिसतेय पंचविशीतील तरुणीसारखी, हे आहे सीक्रेट

'आम्ही वेगळे झालोय' राज कुंद्राच्या पोस्टमुळे खळबळ, नात्यात दुरावा?

BIGG BOSS 17च्या या स्पर्धकांची शैक्षणिक पात्रता माहितीये?

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!