Sam Bahadur Teaser Out : विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’ सिनेमाचा टीझर पाहून अंगात संचारेल देशभक्ती

Sam Bahadur Teaser. विक्की कौशलचा आगामी सिनेमा ‘सॅम बहादुर’चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा सिनेमा 1 डिसेंबरला मोठ्या पडद्यावर झळकळणार आहे.

Sam Bahadur Teaser Out : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलचा (Vicky Kaushal) बहुप्रतीक्षित व बहुचर्चित सिनेमा ‘सॅम बहादुर’चा (Sam Bahadur) टीझर शुक्रवारी (13 ऑक्टोबर 2023) रिलीज करण्यात आला आहे. 

मेघना गुलजार (Meghna Gulzar) दिग्दर्शित ‘सॅम बहादुर’ सिनेमामध्ये विकी भारताचे पहिले फील्ड मार्शल ‘सॅम माणेकशॉ’ (India's first Field Marshal Sam Manekshaw) या रिअर लाइफ हीरोची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारताना दिसणार आहे.

सिनेमाचा टीझर (Sam Bahadur Teaser Out News In Marathi) पाहिल्यानंतर विकीने (Actor Vicky Kaushal Look Like Sam Manekshaw) त्यांची व्यक्तिरेखा उत्कृष्टपणे निभावल्याचे त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. 

चित्रपटाच्या टीझरमध्ये देशभक्ती, भारतीय सैनिकांचा गणवेश आणि या गणवेशप्रति असलेला आदर दिसत आहे. टीझरमध्ये एकापेक्षा एक डायलॉग ऐकायला मिळताहेत. विकीव्यतिरिक्त चित्रपटात अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट येत्या 1 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘Sam Bahadur’ सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

‘सॅम बहादुर’चा टीझर (Sam Bahadur teaser release) पाहिल्यानंतर आता हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टीझरमध्ये युद्धाचे रणांगण, राजकारण आणि सैनिकांची देशभक्ती पाहायला मिळतेय. 

टीझरच्या सुरुवातीला जंगलात सैनिक आणि लष्कराचे ट्रक दाखवण्यात आले आहेत. यानंतर विकीच्या दमदार डायलॉगला सुरुवात होते. विकीचा पुढे असा डायलॉग आहे की, “एक सोल्जर के लिए उसकी जान से ज्यादा कीमती होती है उसकी इज्जत, उसकी वर्दी। और एक सोल्जर अपनी वर्दी की इज्जत के लिए अपनी जान भी दे सकता है।”

1 डिसेंबरला ‘Sam Bahadur’ सिनेमा झळकणार मोठ्या पडद्यावर

मेघना गुलजार यांचा ‘सॅम बहादुर’ सिनेमा 1 डिसेंबरला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. सिनेमामध्ये अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi Former Prime Minister of India) यांची भूमिका साकारतेय. 

तर विकी कौशलच्या पत्नीच्या भूमिकेत सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) दिसणार आहे. विकी कोशलने आपल्या सिनेमाचा टीझर आपल्या इंस्टाग्राम हँडलवर चाहत्यांसाठी शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलंय की,“जिंदगी उनकी, इतिहास हमारा। #Samबहादुर टीजर आउट।”

 

 

आणखी वाचा : 

Animal New Song Hua Mai: रणबीर कपूरने 14 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत केले लिपलॉक, VIDEO VIRAL

रणबीर कपूर 'राम' तर हा अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका

बॉलिवूडचा किंग SHAHRUKH KHANच्या जीवाला धोका, धमक्यांनंतर मिळालं Y PLUS सुरक्षाकवच

Share this article