तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये काम केलेले गुरुचरण सिंह अखेर 25 दिवसानंतर घरी परतले आहेत. यामुळे घरातील मंडळींनी आनंद व्यक्त केला आहे. पण को-स्टार राहिलेली जेनिफर मिस्री फार संतप्त झाली आहे.
Entertainment : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील रोशन सोढीची भूमिका साकारलेले गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) गेल्या 25 दिवसांपासून बेपत्ता होते. अशातच गुरुचरण सिंह सुखरुप घरी परतल्यानंतर घरातील मंडळींनी आनंद व्यक्त केला आहे. पोलिसांनी गुरुचरण यांची चौकशी करत त्यांना गेले 25 दिवस कुठे होते आणि काय करत होते असे प्रश्नही विचारले आहेत. यावर गुरुचरण यांनी मी धार्मिक यात्रेवर होते असे उत्तर दिले. यावेळी वेगवेगळ्या गुरुद्वारामध्ये वेळ घालवल्याचेही गुरुचरण सिंह यांनी सांगितले. अशाच शो मध्ये पत्नीची भूमिका साकारलेली जेनिफिर मिस्री गुरुचरण सिंह यांच्यावर संतप्त झाली आहे.
जेनिफर मिस्रीने दिली अशी प्रतिक्रिया
तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये गुरुचरण सिंह यांच्या पत्नीची भूमिका साकारलेल्या जेनिफर मिस्रीने (Jennifer Mistry) सोढी परत आल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. जेनिफरने न्यूज18 सोबत संवाद साधताना म्हटले की, गुरुचरण परतले आहेत ही एक उत्तम बाब आहे. ते महिनाभर बेपत्ता होते. आई-वडील ते चाहत्यांनाही त्यांची चिंता सतावत होती. पण गुरुचरण सिंह यांनी घरातील मंडळींना सांगायला पाहिजे होते. आता गुरुचरण परत आल्यानंतर सर्वांना दिलासा मिळाला आहे.
जेनिफर यांना गुरुचरण यांनी न सांगता घर सोडल्यावर प्रश्न विचारला असता तिने उत्तर दिले की, त्यावेळी तुम्ही काहीही विचार करू शकत नाही. तुम्हाला वाटते दुनियादारी सोडून साधु व्हावे. मला देखील कधीकधी असेच वाटते. पण माझ्यावर माझ्या पतीसह मुलीची जबाबदारी आहे. जेनिफर यांनी म्हटले, गुरुचरण यांची घरातून निघाल्यानंतर मानसिक स्थिती काय होते हे माहिती नाही.
22 एप्रिलपासून बेपत्ता होते सोढी
गुरुचरण सिंह 22 एप्रिल पासून बेपत्ता होते. ते दिल्लीहून मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. पण विमानतळावर पोहोचले नाहीत. दोन दिवस उलटल्यानंतर गुरुचरण यांच्याबद्दल काही कळले नाही तेव्हा त्यांच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुरुचरण यांचा शोध घेतला आणि दिल्लीतील सीसीटीव्ही फुटेजही तपासून पाहिले. यावेळी गुरुचरण यांनी एटीएममधून 14 हजार रुपये काढल्याचे समोर आले होते. अखेरचे गुरुचरण यांना रिक्षात बसून दिल्लीबाहेर जाताना पाहिले होते.
आणखी वाचा :
2024 मध्ये या 7 सेलेब्सच्या घरी पहिल्यांदाच होणार चिमुकल्याचे आगमन