टेलिव्हिजनवरील या 5 कलाकारांच्या गाजल्यात गणपतीच्या भूमिका

टेलिव्हिजनवरील गणपतींच्या मालिकांनी प्रेक्षकांनी मनं जिंकली. यामधील कालाकारांनी साकारलेल्या गणपतीच्या भूमिकेचेही कौतुक करण्यात आले. याच कलाकारांबद्दल जाणून घेऊया…

Chanda Mandavkar | Published : Sep 7, 2024 4:10 AM IST / Updated: Sep 07 2024, 09:42 AM IST
16
गणेशोत्सवाला देशभरात सुरुवात

गणेशोत्सवाची सर्वांकडून प्रत्येक वर्षी आवर्जुन वाट पाहिली जाते. अशातच आजपासून (7 सप्टेंबर) देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पाची कथा घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम टेलिव्हिजनवरील मालिकांसह सिनेमांनी केली. याशिवाय गणपतीच्या भूमिका साकारलेल्या कलकारांचे कौतूकही करण्यात आले. जाणून घेऊया टेलिव्हिजनवरील गणपतीच्या भूमिका साकारलेल्या कलाकारांबद्दल सविस्तर...

26
जागेश मुकाती (श्री गणेश)

‘श्री गणेश’ मालिका वर्ष 2000 रोजी सोनी टेलिव्हिजनवर प्रदर्शित झाली होती. या मालिकेत जागेश मुकाती यांनी गणपतीची भूमिका साकारली होती. याशिवाय मालिकेत सुनील शर्मा भगवान शंकर आणि गायत्री जयरामन पार्वतीच्या रुपात झळकले होते. जागेश गुजराती नाटकातील प्रसिद्ध कलाकार होते. वर्ष 2020 मध्ये जागेश यांचे निधन झाले.

36
अद्वैत कुलकर्णी (देवा श्री गणेशा)

गणपती बाप्पाच्या लीलांवर आधारित ‘देवा श्री गणेशा’ मालिका वर्ष 2020 रोजी प्रदर्शित झाली होती. या मालिकेत गणपतची अद्वैत कुलकर्णीने भूमिका साकारली होती. पण मालिका केवळ 11 दिवसच टेलिव्हनजवर चालली. टाआरपी कमी मिळत असल्याने मालिका बंद करावी लागली होती.

46
उजैर बसर (विघ्नहर्ता गणेश)

सोनी टिव्हीवरीलल धार्मिक मालिका ‘विघ्नहर्ता गणेश’ मालिका वर्ष 2017 मध्ये रिलीज झाली होती.मालिकेत उजैर बसर आणि निष्कर्ष दीक्षित यांनी गणपतीची भूमिका साकारली होती. वर्ष 2017 ते वर्ष 2021 पर्यंत चाललेल्या मालिकेचे 1026 एपिसोड दाखवण्यात आले होते. यामध्ये आकांक्षा पुरीने पार्वती आणि बसंत भट्ट यांनी कार्तिकेयची भूमिका साकारली होती.

56
संजय भिसे (जय मल्हार)

झी मराठीवरील घरोघरी पसंत केल्या जाणाऱ्या मालिकांपैकी एक ‘जय मल्हार’ मालिका ठरली होती. या मालिकेत भगवान गणपतीची भूमिका संजय भिसे यांनी साकारली होती. वर्ष 2014 मध्ये सुरु झालेली मालिका वर्ष 2017 मध्ये संपली होती.

66
स्वराज येवले (गणपती बाप्पा मोरया)

वर्ष 2015 मध्ये प्रदर्शित झालेली मालिका ‘गणपती बाप्पा मोरया’ ही देवी पार्वती आणि गणपतीच्या नात्यावर आधारित आहे. या मालिकेत गणपतीची भूमिका स्वराज येवले यांनी साकारली होती. मालिकेचे एकूण 539 एपिसोड दाखवण्यात आले होते.

आणखी वाचा : 

Ganesh Chaturthi 2024 निमित्त गणपतीची मराठमोळी गाणी, वाढवतील सणाचा उत्साह

'Saami Saami' गाण्यावर गणपतीच्या मुर्तीचा फोटो व्हायरल, नेटकरी संतप्त

Read more Photos on
Share this Photo Gallery