धर्मेंद्र 'या' मतदारसंघातून होते खासदार, नाव ऐकून म्हणाल पधारो म्हारो देश

Published : Nov 14, 2025, 06:09 PM IST

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी एकेकाळी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकून खासदारपद भूषवले होते, पण नंतर त्यांनी राजकारण आपल्यासाठी नसल्याचे म्हटले. 

PREV
16
धर्मेंद्र 'या' मतदारसंघातून होते खासदार, नाव ऐकून म्हणाल पधारो म्हारो देश

धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्यामुळे ते अनेक दिवसांपासून चर्चेत आले आहेत. आता त्यांना घरी हलवलं असून डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

26
धर्मेंद्र यांनी लढवली होती निवडणूक

धर्मेंद्र यांनी निवडणूक लढवली होती, याबाबतची माहिती अनेकांना अजूनही माहिती नाही. धर्मेंद्र यांच्यासोबत कुटुंबातील दोन सदस्यांनी नशीब आजमावून पाहिलं होतं, ते निवडणूक जिंकले.

36
हेमा मालिनी आणि सनी देओल दोघे होते राजकारणात

हेमा मालिनी आणि सनी देओल हे दोघेही राजकारणात सक्रिय होते. धर्मेंद्र हे कोणत्या मतदारसंघाचे खासदार होते याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊयात.

46
धर्मेंद्र यांनी कोणत्या मतदारसंघातून लढवली निवडणूक

धर्मेंद्र यांनी राजस्थानच्या बिकानेर येथून निवडणूक लढवली होती. यावेळी ते याठिकाणावरून निवडणूक जिंकले होते. त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती.

56
धर्मेंद्र राजकारणावर काय म्हणाले?

धर्मेंद्र यांनी यावेळी राजकारणावर आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यांनी राजकारण आवडत नाही असं म्हटलं आहे. त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रित केलं. राजकारण आपल्यासाठी योग्य नसल्याचं धर्मेंद्र यांनी म्हटलं होतं.

66
हेमा मालिनी मथुरेच्या खासदार

हेमा मालिनी या मथुरेच्या खासदार आहेत. मागच्या ११ वर्षांपासून हेमा मालिनी या मथुरेच्या खासदार आहेत. त्यांनी भाजपकडून निवडणूक जिंकली आणि त्या परत एकदा खासदार झाल्या.

Read more Photos on

Recommended Stories