Published : Jul 02, 2025, 11:29 AM ISTUpdated : Jul 02, 2025, 11:44 AM IST
मुंबई : बॉलिवूडमधील कलाकारांचे आयुष्य लक्झरी आणि आरामदायी असते असे प्रत्येकाला वाटते. पण कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील काही गोष्टी सामान्य व्यक्तींप्रमाणेच असतात. अशातच काही अभिनेत्रींनी त्यांच्यासोबतच्या वन नाइट स्टँडचे किस्से मुलाखतीत शेअर केलेत.
बॉलिवूडमध्ये ‘वन नाईट स्टँड’ हा विषय आता फारसा लपवून ठेवला जात नाही. आजच्या काळात अनेक अभिनेत्री या विषयावर उघडपणे बोलताना दिसतात. काहींनी हे अनुभव अनपेक्षित बदल घेऊन आले, तर काहींसाठी ते वेदनादायक ठरले. कोणाचं नातं लग्नात परिणत झालं, तर कोणाच्या आयुष्यात गर्भपातासारखा निर्णय घ्यावा लागला.
24
महीप कपूर – दारूच्या नशेतून सुरु झालं नातं
कपूर घराण्याची सून 'Fabulous Lives of Bollywood Wives' या नेटफ्लिक्सवरील शोमध्ये महीप कपूर हिने तिच्या प्रेमकथेचा उलगडा केला. ती म्हणाली: “मी ज्याच्यासोबत 'वन नाईट स्टँड' केलं, मला माहीत नव्हतं की त्याच्याशीच लग्न करणार आहे.” महीप संजय कपूरच्या पार्टीत गेली होती, तिथेच दारूच्या नशेत त्यांच्या नात्याची सुरुवात झाली आणि पुढे संजय कपूरसोबत तिचं लग्न झालं. आज ती कपूर घराण्याची सून म्हणून ओळखली जाते.
34
कुब्रा सैत
अभिनेत्री कुब्रा सैत हिने एका मुलाखतीत स्वतःच्या अनुभवाविषयी धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितलं की, एका मित्रासोबत 'वन नाईट स्टँड' झाल्यानंतर ती प्रेग्नंट झाली होती. हा निर्णय तिच्यासाठी खूप भावनिक होता आणि तिने एकटीने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. "ही माझ्या आयुष्यातील एक खासगी आणि वेदनादायी घटना होती," असे कुब्रा म्हणाली होती. अनेक वर्षांनंतर तिने ही गोष्ट सार्वजनिकरित्या कबूल केली.
कश्मीरा शाह – एक रात्रीचं नातं, आयुष्यभराचा जोडीदार
कश्मीरा शाह आणि विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेक यांची ओळख 'पप्पू पास हो गया' चित्रपटादरम्यान झाली. कश्मीरा म्हणते, "त्या रात्री आम्ही 'वन नाईट स्टँड' केलं आणि तेच आमचं आयुष्यभराचं नातं बनलं." दोघांनी काही काळ डेट केल्यानंतर २०१३ मध्ये लग्न केलं आणि आज हे जोडपं सुखी वैवाहिक आयुष्य जगतं आहे.