BB Marathi : निक्की तंबोळीला मिळाली महाराष्ट्राच्या अपमानाची शिक्षा (VIDEO)

Published : Aug 04, 2024, 11:18 AM IST
Ritesh Deshmukh got angry on Nikki Tamboli in BB Marathi Season 5

सार

Bigg Boss Marathi Season 5 Updates : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये निक्की तंबोळीमुळे शो रंगत चालला आहे. रितेश भाऊंच्या धक्क्यावर निक्की तंबोळीला घरात अन्य सदस्यांसोबत केलेल्या वागणुकीसह महाराष्ट्राच्या केलेल्या अपमानाची शिक्षा दिली. 

Bigg Boss Marathi Season 5 Updates :  बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट झालेल्या सदस्यांची शाळा रितेश भाऊच्या धक्क्यांवर रितेश देशमुखने शनिवारी (03 ऑगस्ट) घेतली. नॉमिनेशन प्रक्रियेत वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण आणि पुरुषोत्तमदादा पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. पण याआधी निक्कीला तिच्या घरातील सदस्यांसोबतच्या वागणूकीमुळे चांगलेच सुनावण्यात आले. याशिवाय बिग बॉसच्या घरात महाराष्ट्राचा केलेला अपमानही तिला चांगलाच भारी पडला आहे.

निक्की तंबोळीवर रितेश भाऊंचा संताप 
नक्की तंबोळीने बिग बॉसच्या घरात मराठी माणसाच्या मानसिकतेला ठेच पोहोचवलीच. याशिवाय मराठी माणसाचाही अपमान केल्याने रितेश देशमुखने तिच्यावर संताप व्यक्त केला. यावर निक्कने स्पष्टीकरण देण्यासाठी हात वर केला. यावर रितेशने तिला हात खाली करत मी बोलतोय असे म्हणत आत्ताच्या आता माझ्या मराठी माणसाची माफी मागावी लागेल असे म्हटले. एवढेच नव्हे बिग बॉसच्या घरात "ज्याला बोलायचं भान नाही, त्याला या घरात स्थान नाही" अशा कठोर शब्दांतही निक्कीला सुनावले. यानंतर निक्कीचे घरातील सदस्यांचीही माफी मागत यापुढे मराठी माणसाबद्दल किंवा त्यासंदर्भातील वाईट शब्द बोलणार नाही असेही म्हटले.

नक्की तंबोळीचे घरातील सदस्यांसोबतचे वाद
निक्की तंबोळीचे सातत्याने घरातील कोणत्या ना कोणत्या सदस्यासोबत वाद होताना दिसून येत आहे. निक्कीने अनेकदा मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा केलेला अपमान, आर्यासोबतचे भांडण किंवा मराठी माणसाच्या मानसिकतेवर केलेले भाष्य तिला आता चांगलेच भारी पडत आहे. यामुळे निक्कीला शिक्षा मिळाल्यानंतर ती यापुढे घरातील सदस्यांसोबत कसे वागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहेच. शिवाय नक्की तंबोळी शो मध्ये कशी स्वत:ला ठसा उमटवते हे पाहावे लागणार आहे. 

बिग बॉसच्या घरात फ्रेंडशिप डे होणार साजरा
बिग बॉसच्या घरात 16 स्पर्धकांनी एण्ट्री केली आहे. यामधील सर्व स्पर्धक वेगवेगळ्या क्षेत्रांमधील आहेत. तर 4 ऑगस्टला साजरा केल्या जाणाऱ्या फ्रेंडशिप डे निमित्त खास धम्मालही बिग बॉसच्या घरात होणार आहे. यावेळी सदस्य एकमेकांना फ्रेंडशिप डे चे लॉकेट देत त्यांना एक टॅगही लावणार आहेत. यावेळी घनश्याम आणि योगिता चव्हाण यांच्यामध्ये शाब्दिक वाद होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : 

निक्की तंबोळीवर भडकला BB मराठीच्या सीझन 3 मधील स्पर्धक, म्हणाला...

BB Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात आर्या आणि जान्हवीमध्ये तुफान राडा, VIDEO

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!