Bhumi Pednekar : ओठांवरील कमेंटमुळे भूमी पेडणेकर सुन्न झाली आहे. 'द रॉयल्स' या वेब सीरिजनंतर अभिनेत्रीने मनमोकळेपणाने संवाद साधला असून, ओठांबद्दलच्या ट्रोलिंगमुळे धक्का बसल्याचे तिने म्हटले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर 'द रॉयल्स' या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजची खूप चर्चा झाली होती. विशेषतः भूमी पेडणेकरवर टीका आणि ट्रोलिंग झाले होते. 'द रॉयल्स'नंतर शांत असलेली भूमी पेडणेकर आता आपले दुःख व्यक्त करत आहे.
25
ओठांवरून झाली ट्रोल
'द रॉयल्स' सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर माझ्यावर वाईट कमेंट्स करण्यात आल्या. अनेकांनी ट्रोल केले. यात माझ्या अभिनयावर आणि ओठांच्या शस्त्रक्रियेवर टीका आणि ट्रोलिंग करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर ओठ खराब झाल्याचे सांगून ट्रोल केले.
35
ओठांवरील कमेंटने भूमी सुन्न
हॉलिवूड रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत भूमी पेडणेकरने आपले दुःख व्यक्त केले आहे. ओठ आणि अभिनयावरील कमेंट्स, ट्रोलिंग पाहून मला धक्का बसला होता. त्यातून सावरायला बराच वेळ लागला. गेल्या 9 महिन्यांपासून मी या सगळ्यापासून दूर होते, असे भूमीने सांगितले.
गेल्या 9 महिन्यांत ट्रोलिंगमधून बाहेर पडण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, हार्वर्ड विद्यापीठात एक कोर्स केला. हळूहळू मी ट्रोलिंगमधून बाहेर आले आहे. आता मी पुढच्या वेब सीरिजची तयारी सुरू केली आहे, असे तिने सांगितले.
55
माझ्यात प्रतिभा आहे का?
काही महिने माझ्या प्रतिभेबद्दल शंका निर्माण झाली होती. मी अभिनय करू शकते का, माझे ओठ इतके वाईट दिसतात का, अशी शंका मनात येत होती. जवळच्या लोकांच्या मदतीने मी सावरले, असे भूमी पेडणेकरने सांगितले.