Dhanush to marry Mrunal Thakur on Valentines Day : हो, ते दोघे प्रेमात आहेत हे खरं आहे. पण हे नातं अगदी नवीन आहे. आपलं नातं सार्वजनिक किंवा मीडियासमोर अधिकृतपणे जाहीर करण्याची त्यांची कोणतीही योजना नाही, असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
धनुष (४२) आणि मृणाल ठाकूर (३३) १४ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्न करणार असल्याची चर्चा आहे. हे लग्न फक्त जवळचे कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
24
या लग्नाच्या चर्चांनी चाहते उत्सुक असले तरी, दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 'सन ऑफ सरदार २' च्या प्रीमियरपासून त्यांच्या नात्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
34
एका जवळच्या सूत्रानुसार, 'हो, ते प्रेमात आहेत, पण हे नातं नवीन आहे. ते सार्वजनिकरित्या जाहीर करणार नाहीत. त्यांचे मित्र या नात्याला पाठिंबा देत आहेत.'
गेल्या वर्षी मृणालने धनुषला 'फक्त चांगला मित्र' म्हटले होते. धनुषने यापूर्वी ऐश्वर्या रजनीकांतसोबत १८ वर्षे संसार केला होता. २०२२ मध्ये ते विभक्त झाले. त्यांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुले आहेत.