Entertainment News: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार होत असून 'मा वंदे' असं या सिनेमाचं नाव आहे. एकंदर 400 कोटी रूपयांचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाबद्दल एक जबरदस्त अपडेट समोर आली आहे.
खेळाडू आणि राजकारण्यांच्या बायोपिक्सबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असते. त्यांचं आयुष्य लोकांशी जोडलेलं असतं. त्यांच्या आयुष्यात ड्रामा, संघर्ष आणि वादविवाद असतील तर ते आणखी रंजक ठरतात. आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांचे बायोपिक आले आहेत. पण आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक येत आहे. 'मा वंदे' असं या सिनेमाचं नाव आहे. घोषणेपासूनच या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच निर्माते मोठ्या बजेटमध्ये कोणतीही तडजोड न करता हा सिनेमा बनवत आहेत.
25
मोदींच्या भूमिकेत उन्नी मुकुंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक 'मा वंदे' या नावाने सिल्व्हर कास्ट क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते वीर रेड्डी एम. तयार करत आहेत. या सिनेमात नरेंद्र मोदींची भूमिका मल्याळम स्टार उन्नी मुकुंदन साकारत आहे. 'अनेक संघर्षांपेक्षा आईचा संकल्प मोठा असतो' हा संदेश देत, दिग्दर्शक क्रांतीकुमार सी.एच. मोदींच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित हा सिनेमा सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना आवडेल अशाप्रकारे बनवत आहेत. पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यातील सर्व गोष्टी 'मा वंदे' सिनेमात नैसर्गिकरित्या दाखवल्या जाणार आहेत.
35
'मा वंदे' सिनेमाचे बजेट
हा सिनेमा आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि VFX वापरून बनवला जात आहे. 'मा वंदे' पॅन-इंडिया भाषांसोबतच इंग्रजीमध्येही प्रदर्शित होणार आहे. 'अनेक संघर्षांपेक्षा आईचा संकल्प मोठा असतो' हा संदेश प्रेक्षकांना आकर्षित करेल, असं टीमचं म्हणणं आहे. टीमने या सिनेमाचं बजेट जाहीर केलं आहे. हा सिनेमा तब्बल 400 कोटी रुपयांमध्ये बनवला जात आहे. वर्ल्ड क्लास क्वालिटीसह हा सिनेमा तयार होत असून तो हॉलिवूड सिनेमांपेक्षा कमी नसेल, असं सांगितलं जात आहे.
'मा वंदे'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेसाठी हॉलिवूड अभिनेता
'मा वंदे' सिनेमाची निर्मिती सिल्व्हर कास्ट क्रिएशन्स संस्था 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेटमध्ये करत आहे. हा स्टोरी-ड्रिव्हन सिनेमा जगात पहिल्यांदाच Arri Alexa 265 Gentry आणि Cookie Lenses वापरून शूट केला जात आहे. हॉलिवूडचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'ॲक्वामॅन'चा हिरो जेसन मोमोआ याला या सिनेमातील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी विचारणा होत आहे. रवीना टंडन, जगपती बाबू, शरथ कुमार यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी पहिल्याच बैठकीत कथा आवडल्याने सिनेमा करण्यास होकार दिला आहे.
55
इतिहासात कायम लक्षात राहील असा 'मा वंदे'
स्टंट कोरिओग्राफर किंग सॉलोमन, प्रोडक्शन डिझायनर साबू सिरिल, एडिटर श्रीकर प्रसाद, डीओपी के.के. सेंथिल कुमार, संगीत दिग्दर्शक रवी बसरूर यांसारखे टॉपचे तंत्रज्ञ यावर काम करत आहेत. हा केवळ एक बायोपिक नसून चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कायम लक्षात राहील असा एक मोठा प्रोजेक्ट म्हणून 'मा वंदे' तयार होत आहे. प्री-प्रॉडक्शनसाठीच तीन वर्षे लागली, यावरून निर्माते किती मेहनत घेत आहेत हे समजतं. सिनेमाचं पहिलं शेड्यूल पूर्ण झालं असून, दुसरं शेड्यूल या महिन्याच्या 22 तारखेपासून काश्मीरमध्ये सुरू होणार आहे, असं टीमने सांगितलं. त्यामुळे देशभरातील प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.