Bhool Bhulaiyaa 3 सिनेमात कार्तिक आर्यनसोबत मुख्य भुमिकेत झळकणार तृप्ति डिमरी, अभिनेत्याने शेअर केली इंस्टाग्राम पोस्ट

Published : Feb 21, 2024, 05:32 PM ISTUpdated : Feb 21, 2024, 05:39 PM IST
bhool bhulaiyaa 3

सार

कार्तिक आर्यन स्टारर भूल भुलैया 3 सिनेमाची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे. अशातच कार्तिकने सिनेमातील मुख्य भुमिकेतील अभिनेत्रीचा खुलासा केला आहे. या संदर्भातील एक पोस्ट कार्तिकने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

Bhool Bhulaiyaa 3 Movie : कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या ‘भूल भुलैया 3’ सिनेमामुळे लाइमलाइटमध्ये आहे. या सिनेमात मुख्य भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा खुलासा करण्यात आला आहे. खरंतर, कार्तिकने आपल्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर सिनेमातील मुख्य अभिनेत्रीचा खुलासा केला आहे. याआधी कार्तिकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक Puzzle दिले होते. याचेच उत्तर चाहत्यांनी योग्य देत सिनेमातील मुख्य भुमिका साकारणारी अभिनेत्री कोण असणार सांगितले होते.

लवकरच प्रदर्शित होणार ‘भूल भुलैया’ 3 सिनेमा
वर्ष 2007 मध्ये आलेल्या अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर ‘भूल भुलैया’ चा तिसरा पार्ट आहे. याआधीचा पार्ट वर्ष 2022 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भुमिकेत झळकला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अशातच ‘भूल भुलैया 3’ कधी प्रदर्शित होणार याची वाट प्रेक्षकांकडून पाहिली जात आहे.

सिनेमात तृप्ति डिमरी दिसणार मुख्य भुमिकेत
‘भूल भुलैया 3’ सिनेमात अ‍ॅनिमल सिनेमातील अभिनेत्री तृप्ति डिमरी मुख्य भुमिकेत दिसणार आहे. कार्तिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये एका गोलाकार टेबलवर तृप्ति डिमरीचा फोटो असून त्याच्या बाजूला चावी आणि मेणबत्त्या दिसून येत आहेत. याशिवाय ‘भूल भुलैया 3’ चे कार्डही दिसून येत आहे.

कार्तिक आणि तृप्ति पहिल्यांदाच एकत्रित काम करणार
रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच कार्तिक आणि तृप्ति डिमरी एकत्रित काम करणार आहेत. भूल भुलैया 3 सिनेमात तृप्ति मुख्य भुमिकेत असल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. याशिवाय तृप्तिला पाहण्यासाठी आता प्रेक्षक अधिक उत्सुक झाले आहेत.

आणखी वाचा : 

Dadasaheb Phalke Awards 2024 : शाहरुख खानला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

विद्या बालनच्या नावाखाली सोशल मीडियात नागरिकांची फसवणूक, अभिनेत्रीने दाखल केला FIR

Exclusive : देशातील तरुणांसाठी सात वर्षानंतर रेसलिंगच्या जगात संग्राम सिंहचे कमबॅक, वाचा अभिनेत्याने दिलेला फिटनेस मंत्र

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!