कधीकाळी ट्रेनमध्ये गाणी गाऊन कमावले पैसे, आज आहे कोट्यावधींचा मालक

आयुष्मान खुरानाने आपल्या करियरमध्ये आतापर्यंत 'विक्की डोनर', 'बधाई हो' अशाकाही धमाकेदार सिनेमातून आपला ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यापर्यंतचा आयुष्मानचा प्रवास सोपा नव्हता.

Ayushmann Khurana Life Journey : फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण बहुतांश कलाकारांच्या यशाच्या कथा ऐकतो. शाहरुख खान ते राजकुमार रावपर्यंतचे असे काही कलाकारा आहेत ज्यांनी यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आयुष्यात खूप मेहनत केली. आपल्या कौशल्याच्या जोरावर यशस्वी होऊ दाखवले आहेत. याच कलाकारांच्या लिस्टमध्ये आयुष्मान खुरानाचेही नाव येते. आयुष्मान खुरानाला सर्वजण ओखलतात. आयुष्मानचा गायक ते अभिनेत्याचा प्रवास राहिला आहे.

बहुआयामी अभिनेता आयुष्मानने आजवर सिनेमान नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अशातच आयुष्मानच्या आयुष्यातील काही खास किस्से जाणून घेणार आहोत.

बालपणापासून गाण्याची आवड
आयुष्मान खुरानाला बालपणापासूनच गायनाची आवड होती. यामुळे कॉलेजमध्येही आयुष्मान गाण्याच्या काही स्पर्धांमध्ये आवर्जुन भाग घ्यायचा. एवढेच नव्हे त्या वेळी आयुष्मान मित्रांसोबत दिल्ली ते मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये आवड म्हणून गाणे गायचा.

ट्रेनमधील गाण्याची आवड
आयुष्मानने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, कॉलेजच्या वेळी पैशांची चणचण असायची. पण मित्रपरिवारासोबत खूप मजा-मस्ती करायचो. अशातच ट्रेनमध्ये गाणी गायल्यानंतर काहीजण पैसेही द्यायचे. असेच एकदा ट्रेनमध्ये गायल्यानंतर प्रवाशांना आमचे गाणे खूप आवडले आणि त्यांनी त्यासाठी खूप पैसेही दिले. याच पैशामधून गोव्याची ट्रिपही केली होती.

मुंबईत आल्यानंतर केला स्ट्र्गल
चंदीगढ येथून इंग्लिश लिट्रेचरमध्ये ग्रॅज्युएशन केले. यानंतर पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये स्कूल ऑफ कम्युनिकेशनच्या माध्यमातून मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर डिग्री मिळवली. कॉलेज पूर्ण केल्यानंतर आयुष्मानने मुंबईत पाऊल ठेवले. येथूनच आयुष्माच्या आयुष्यातील स्ट्रगल सुरु झाला. यादरम्यान, अनेक धक्के खावे लागले. पण वर्ष 2004 नंतर आयुष्मान रोडीज शो मध्ये झळकला. या शो मध्ये आयुष्मानने विजय मिळवला होता.

याआधी दिल्लीत बिग एफएफममध्ये आरजेच्या रुपात आयुष्मानने काम केले होते. रेडियोच्या जगाला गुडबाय करत त्याने एमटीव्हीवरील काही शो मध्ये जॉकीच्या रुपात काम केले. यानंतर टेलिव्हनजवरही 'इंडियाज गॉट टॅलेंट' आणि 'म्युझिक का महामुकाबला' सारख्या शो साठी सूत्रसंचालन केले.

रोडीज शो नंतर बदलले आयुष्य
रोडीज शो मध्ये जिंकल्यानंतर आयुष्मानच्या करियरला वेग मिळू लागला. आयुष्मानने जॉकीच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली होता. येथूनच अभिनेत्याला पहिला सिनेमा 'विक्की डोनर' ऑफर झाला होता. वर्ष 2012 मध्ये आलेल्या सिनेमातून आयुष्मानच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंत केले. यानंतर आयुष्मानने आयुष्यात कधीच मागे वळून पाहिले नाही.

या सिनेमांमुळे मिळाली ओळख
विक्की डोनरनंतर आयुष्मानने 'नौटंकी साला', 'बेवफूकिया', 'हवाईजादा' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नाही. पण आयुष्यमाचा 'दम लगा के हईशा', 'बरेली की बर्फी', 'बधाई हो', 'ड्रिम गर्ल', 'बाला' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' सारख्या सिनेमातून दमदार भूमिका करत प्रेक्षकांची मनं जिंकली.

आणखी वाचा : 

6 वर्षांनंतर Tumbbad आजपासून री-रिलीज होणार, वाचा सिनेमा पाहण्याची 5 कारणे

Sai Tamhankar च्या नव्या फोटोशूटने सोशल मीडियावर लावली आग, पाहा PICS

Share this article