6 वर्षांनंतर Tumbbad आजपासून री-रिलीज होणार, वाचा सिनेमा पाहण्याची 5 कारणे

राही अनिल वर्बे यांनी दिग्दर्शित केलेला ‘तुंबाड’ सिनेमा आजपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांना सिनेमागृहांमध्ये पाहता येणार आहे. खरंतर, सिनेमा वर्ष 2018 मध्ये रिलीज झाला होता. यानंतर प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तुंबाड सिनेमा पाहिला.

Tumbbad Re-release : बॉलिवूडमधील काही सिनेमे गेल्या काही काळापासून प्रेक्षकांसाठी री-रिलीज केले जात आहेत. यामुळे नव्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमा थिएटरमध्ये पाहण्याची संधी मिळत आहे. याआधी ‘रहना है तेरे दिल मै’, ‘लैला मजनू’ असे सिनेमे सिनेमागृहांमध्ये री-रिलीज करण्यात आले होते. अशातच आजपासून (13 सप्टेंबर) सोहम शाह याची मुख्य भूमिका असेलला 'तुंबाड' सिनेमा री-रिलीज होत आहे.

वर्ष 2018 मध्ये झाला होता रिलीज
तुंबाड सिनेमा पहिल्यांदा वर्ष 2018 मध्ये सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरुन प्रतिसाद दिला होता. याशिवाय सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला. आता पुन्हा एकदा सिनेमा सिनेमागृहांमध्ये रिलीज केला जात असून प्रेक्षक पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत. अशातच जाणून घेऊया तुंबाड सिनेमा पाहण्याची 5 प्रमुख कारणे काय आहेत सविस्तर...

दिग्दर्शकाची 20 वर्षांची मेहनत
दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी तुंबाड सिनेमाचा पहिला ड्राफ्ट वर्ष 1997 मध्ये लिहिला होता. यावेळी राही केवळ 18 वर्षांचे होते. सिनेमाच्या कथेत अनेकदा बदल आणि त्यावर कामही झाले. 7 प्रोडक्शन हाउसने अखेर तुंबाड सिनेमा तयार करण्यासाठी आधी होकार दिला पण नंतर नकार दिला. या सिनेमावर तीन वेळा काम सुरु होत बंदही झाले.

वर्ष 2008 मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला घेऊन तुंबाड सिनेमाचे काम सुरु करण्यात आले होते. यानंतर निर्माते मागे हटले आणि सिनेमाचे काम बंद पडले. अखेर वर्ष 2012 मध्ये सोहम शाहसोबत सिनेमा तयार करण्यास सुरुवात केली. सिनेमाचा पहिला ड्राफ्ट लिहिल्याच्या 20 वर्षानंतर वर्ष 2018 मध्ये सिनेमा अखेर प्रदर्शित करण्यात आला होता.

सोहम शाहची मेहनत
तुंबाड सिनेमात मुख्य भूमिका सोहम शाह याने साकारली आहे. आपल्या भूमिकेला पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न सोहम शाहने सिनेमातून केला आहे. याशिवाय सोहम शाह सिनेमाचा प्रोड्यूसरही आहे. सिनेमासाठी सोहमने 8 किलो वजन वाढवले होते. एवढेच नव्हे रियल इस्टेट व्यावसायिक राहिलेल्या सोहम शाहने तुंबाड सिनेमासाठी आपल्या काही प्रॉपर्टीज विक्री देखील केल्या होत्या.

रियल टाइमवर केलेय शूटिंग
सिनेमाच्या संपूर्ण कथेतील सीन रियल टाइमवर शूट करण्यात आलेले आहेत. सिनेमात पावसाचा सीन दाखवण्यात आला आहे त्यासाठी काही महिने सिनेमाच्या टीमने वाट पाहिली होती. खास गोष्ट अशी की, तुंबाड सिनेमा अशा ठिकाणी शूट केलाय जेथे शंभर वर्षे कोणीही फिरकलेले नाही. याशिवाय सिनेमातील हस्तरचे पात्र सर्वाधिक गाजले आहे.

पहिल्यांदा रिलीजवेळी मिळाले होते मर्यादित थिएटर
तुंबाड सिनेमा पहिला भारतीय सिनेमा होता जो जगातील सर्वाधिक मोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला. सिनेमाला मोठा निर्माता न मिळाल्याने मर्यादित थिएटरमध्येच प्रदर्शित करण्यात आला होता. वर्ष 2018 मध्ये तुंबाड सिनेमाला 575 स्क्रिन मिळाल्या होत्या.

बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई
तुंबाड सिनेमाने ओपनिंग डे वेळी 65 लाख रुपयांची कमाई केली होती. यानंतर सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 5 कोटी रुपयांमध्ये तयार करण्यात आलेल्या सिनेमाने जगभरात 13 कोटी रुपयांच्या आसपास कमाई केली होती.

आणखी वाचा : 

विकेंडला होईल मनोरंजनाचा डबल धमाका, पाहा हे 8 Comedy Movies

Sai Tamhankar च्या नव्या फोटोशूटने सोशल मीडियावर लावली आग, पाहा PICS

Share this article