अनसूया सेनगुप्ताने रचला इतिहास, Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी ठरली पहिलीच भारतीय Actress

कान्स फिल्म फेस्टिव्हलध्ये कोलकाता येथे राहणारी अभिनेत्री अनसूया सेनगुप्ताने इतिहास रचला आहे. अनसूयाला कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Chanda Mandavkar | Published : May 25, 2024 8:00 AM IST / Updated: May 25 2024, 01:33 PM IST

Cannes Film Festival 2024 :  77व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेट कार्पेटवर सध्या सेलेब्सचा धमाकेदार जलवा पाहायला मिळत आहे. अशातच बॉलिवूडसह भोजपुरी स्टार प्रदीप पांडे चिंटू यांनीही रेट कार्पेटवर एण्ट्री केल्याचे दिसून आले. याशिवाय बॉलिवूडमधील अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि कियारा अडवाणीसारख्या सेलेब्सनेही आपल्या अदांनी रेट कार्पेटवर धमाकेदार एण्ट्री केल्याचे दिसून आले. अशातच कोलकाता येथे राहणारी अनसूया सेनगुप्ताने (Anasuya Sengupta) इतिहास रचला आहे. अनसूयाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (Best Actress) पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार अभिनेत्रीला 'शेमलेस' सिनेमासाठी देण्यात आला आहे. यामुळे कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार गौरवणारी अनसूया पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

कोण आहे अनसूया सेनगुप्ता
अनसूया सेनगुप्ताने मुंबईत आपली ओखळ प्रोडक्शन डिझाइनरच्या रुपात तयार केली आहे. सध्या अनसूया गोव्यात राहतेय. अनसूयाने नेटफ्लिक्सवरील शो 'मसाबा मसाबा' च्या सेटचे डिझाइनही केले होते. दुसऱ्या बाजूला अनसूयाच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास तिने जादवपुर विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे.

अभिनेत्रीने एकदा 'द कोलकाता’' ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, तिला कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी नॉमिनेशन मिळाले आहे. या बातमीने अनसूयाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

पत्रकारिततेत करायचे होते करियर
अनसूया सेनगुप्ताने इंग्लिश लिटरेचरमध्ये शिक्षण घेतले आहे. तिला पत्रकारिततेत करियर करण्यासाठी कामेही शोधत होती. याशिवाय अन्य काही गोष्टी आयुष्यात करण्याचाही विचार अनसूयाने केला होता. अनसूयाने वर्ष 2009 मध्ये प्रदर्शित झालेला अंजना दत्ता यांचा सिनेमा 'मॅडली बंगाली' मधून सपोर्टिंग रोल प्ले केला होता. यानंतर वर्ष 2013 मध्ये मुंबईत आल्यानंतर काही काळ थिएटरमध्ये काम केले. यानंतर प्रोडक्शन डिझाइनरच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली होती.

शेमलेसची कशा काय आहे?
अनसूयाला 'शेमलेस' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या सिनेमाची कथा रेणुकाच्या भोवती फिरते. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या प्रकरणानंतर ते वेश्यालयापर्यंतचा प्रवास अशी एकूणच सिनेमाची कथा आहे. यामध्ये रेणुकाची प्रेमिका ओमारा शेट्टीही आहे.

आणखी वाचा : 

हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्याच्या चर्चांदरम्यान नताशाने शेअर केला पहिला फोटो, अशी घेतेय स्वत:ची काळजी

बॉलिवूड नव्हे साउथ सिनेमात हे कलाकार आजमावणार आपले नशीब, पाहा लिस्ट

Share this article