हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्याच्या चर्चांदरम्यान नताशाने शेअर केला पहिला फोटो, अशी घेतेय स्वत:ची काळजी

Published : May 25, 2024, 09:35 AM ISTUpdated : May 25, 2024, 09:36 AM IST
Natasa Stankovic Instagram

सार

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या नात्यात फूट पडल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. अशातच नताशाने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

Hardik Pandya and Natasa Stankovic Relationship :  भारतीय टी20 वर्ल्ड कप संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या एक प्रोफेशनल खेळाडूसह आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून हार्दिकच्या खासगी आयुष्यात काही समस्या सुरू असल्याची चर्चा आहे. हार्दिक आणि नताशा या दोघांच्या नात्यात फूड पडल्याच्या बातमीने सध्या जोरही धरला आहे. खरंतर, नताशाने ज्यावेळी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हार्दिक पांड्याचे आडनाव डिलिट केल्यानंतर चर्चांनी अधिक वेग धरला होता. यावरुन असा अंदाज लावला जातोय की, हार्दिक आणि नताशामध्ये सर्वकाही ठिक नाहीये. दोघेही एकमेकांपासून विभक्त होणार आहेत. अशातच नताशाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून ती वेगाने व्हायरल होत आहे.

नताशाची इंस्टाग्रामवरील पोस्ट
अभिनेत्री आणि मॉडेल नताशाने हार्दिकपासून विभक्त होण्याच्या बातम्यांदरम्यान आपली पहिली पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. नताशाने इंस्टाग्रामवर स्टोरीवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. यावेळी नताशाने मिरर सेल्फी काढला आहे. खरंतर, अभिनेत्रीच्या सेल्फ लव्हचा तो फोटो आहे. याशिवाय पुढच्या स्टोरीमध्ये फ्रायडे फीट आणि जिममध्ये वर्कआउट करतानाचा फोटोही शेअर केला आहे.

आयपीएलवेळी हार्दिकला सपोर्ट करण्यासाठी नाही आली
प्रत्येक आयपीएलच्या सामन्यांप्रमामे यंदाच्या आयपीएलवेळी नताशा हार्दिकला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर दिसली नाही. याच कारणास्तव नताशा आणि हार्दिकमध्ये सर्वकाही ठिक नसल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविकने जानेवारी 2020 रोजी साखरपुडा केला होता. यानंतर वर्ष 2020 मे ला दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. याशिवाय वर्ष 2020 मध्येच नताशाने पहिला मुलगा अगस्त्यला जन्म दिला होता.

हार्दिकची नताशाच्या वाढदिवसानिमित्तची पोस्ट
मार्च महिन्यामध्ये हार्दिक पांड्याने नताशाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियात कोणतीही पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या नव्हत्या. या दोघांमध्ये काहीतरी बिनसलयं अशी चर्चा आहे. हार्दिक पांड्याने 9 एप्रिलला घरातील एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये हार्दिकची पत्नी आणि सासरची मंडळी दिसून आली होती. यानंतर हार्दिकने नताशासोबतची कोणतीही पोस्ट शेअर केली नाहीये.

आणखी वाचा : 

बॉलिवूड नव्हे साउथ सिनेमात हे कलाकार आजमावणार आपले नशीब, पाहा लिस्ट

Pushpa 2 Song Angaaron : 'पुष्पा 2' सिनेमातील दुसऱ्या गाण्याचा टीझर प्रदर्शित, श्रीवल्लीच्या अदांवर चाहते फिदा (Watch Video)

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!