Anant-Radhika च्या लग्नसोहळ्यात चक्क मराठमोळे गाणे 'गुलाबी साडी' वर थिरकले पाहुणे, पाहा VIDEO

Published : Jul 14, 2024, 07:00 PM ISTUpdated : Jul 14, 2024, 07:02 PM IST
Anant-Radhika Wedding Ceremony Guest Dance on Gulabi Sadi Song

सार

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाहसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या लोहळ्याला अनेक पाहुण्यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रसिद्ध गायकांनी आपला परफॉर्मेन्स दिला. याशिवाय गुलाबी साडी गाण्यावर पाहुणे थिरकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Anant-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाहसोहळा 12 जुलैला मुंबईत पार पडला. या लग्नसोहळ्या देश-विदेशातील पाहुण्यांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. या कपलचे लग्नानंतरचे फंक्शन 15 जुलैपर्यंत सुरु राहणार आहेत. या वेगवेगळ्या फंक्शनला बॉलिवूड सेलिब्रेंटीपासून ते क्रिकेट क्षेत्रातील खेळाडूंनी जोरदार धम्माल-मस्ती केल्याचे काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला प्रसिद्ध गायकांना देखील आपला परफॉर्मेन्स करण्यासाठी बोलावण्यात आले होते. अशातच अंबानींच्या लग्नसोहळ्यात चक्क मराठमोळे गाणे वाजल्यानंतरच पाहुण्यांनी धरलेल्या ठेक्याचा सध्या व्हिडीओ सोशल मीडियात तुफान गाजत आहे. 

गुलाबी साडीवर थिरकले पाहुणे
सोशल मीडियावरील रिल्सवर सध्याच्या ट्रेण्ड म्हणजे गुलाबी साडी. यावर अनेकांनी आतापर्यंत रिल्स, व्हिडीओ शूट केले आहेत. पण गायक संजू राठोडच्या गाण्याने आता चक्क अंबानींच्या पाहुण्यांना नाचवल्याचे दिसून आले आहे. संजू राठोडने अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यावेळी गुलाबी साडीवर लाइव्ह परफॉर्मेन्स दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये संजू राठोड गाणे गात असून अंबानींचे पाहुणे गुलाबी साडीवर थिरकताना दिसून येत आहेत. 

शुभ आशीर्वाद सोहळ्याला व्हीव्हीआयपींची उपस्थिती
अनंत-राधिकाचा शुभ आशीर्वाद सोहळा 13 जुलैला जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. या लहान रिसेप्शनला अनेक व्हीव्हीआयपी (VVIP), राजकीय नेतेमंडळी आणि बॉलिवूडमधील सेलिब्रेटी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. पाहुण्यांच्या लिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, ठाकरे परिवार (Thackery Family), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रेटी आणि राजकीय नेतेमंडळी आली होती.

14 जुलैला अनंत-राधिकाचा मंगल उत्सव
अनंत-राधिकाच्या लग्नपत्रिकेनुसार, 14 जुलैला मंगल उत्सव होणार आहे. यामध्येही काही बॉलिवूड कलाकार उपस्थितीत राहणार आहेत. याशिवाय 15 जुलैला रिलायन्स जिओच्या कर्मचाऱ्यांसाठी रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

अनंत-राधिकाच्या मंगल उत्सवाला शाहरुख खान येणार नाही? समोर आले कारण

Anant-Radhika Subha Ashirwad : अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला सुरुवात, बॉलिवूड कलाकार ते राजकीय मंडळींची उपस्थिती (PHOTOS)

PREV

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?