Anant-Radhika ला आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहण्याची शक्यता, पाहा VVIP पाहुण्यांची लिस्ट

Published : Jul 13, 2024, 06:24 PM ISTUpdated : Jul 13, 2024, 06:30 PM IST
anant ambani radhika merchant shubh aashirwad ceremony

सार

Anant-Radhika Subha Ashirwad : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा शुभ आशीर्वाद सोहळा 13 जुलैला जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्यता आहे. याशिवाय काही व्हीव्हीआयपींसह बॉलिवूड कलाकारही येणार आहेत.

Anant-Radhika Subha Ashirwad : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. कपलने 12 जुलैला जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये धूमधडाक्यात लग्न केले. या सोहळ्याला देश-विदेशातून पाहुणे आले होते. अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याचे फंक्शन येत्या 15 जुलैपर्यंत होणार आहेत. 13 जुलैला शुभ आशीर्वाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.

शुभ आशीर्वाद सोहळ्यातील पाहुण्यांची यादी
अनंत-राधिकाचा शुभ आशीर्वाद सोहळा 13 जुलैला जिओ वर्ल्ड सेंटरमध्येच होणार आहे. या लहान रिसेप्शनला अनेक व्हीव्हीआयपी (VVIP), राजकीय नेतेमंडळी आणि बॉलिवूडमधील सेलिब्रेटी उपस्थिती लावणार आहेत. पाहुण्यांच्या लिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, ठाकरे परिवार (Thackery Family), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रेटी येणार आहेत.

शुभ आशीर्वाद सोहळ्याला फॉर्मल ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. याशिवाय 14 वर्षाखालील मुलांना सोहळ्यात सहभागी होता येणार नाहीये. सोहळ्यासाठी जिओ वर्ल्ड सेंटर येथे कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.

सेलिब्रेटींची लिस्ट
बॉलिवूड सेलिब्रेटींपैकी काही खास कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, शाहिद कपूर, विक्की कौशलसह अन्य काही कलाकार येणार आहेत.

14 जुलैला अनंत-राधिकाचा मंगल उत्सव
अनंत-राधिकाच्या लग्नपत्रिकेनुसार, 14 जुलैला मंगल उत्सव होणार आहे. यामध्येही काही बॉलिवूड कलाकार उपस्थितीत राहणार आहेत. याशिवाय 15 जुलैला रिलायन्स जिओच्या कर्मचाऱ्यांसाठी रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

Anant Ambani च्या लग्नसोहळ्यावरुन परतल्यानंतर अमिताभ बच्चन यांची Cryptic Post, रिलेशिपबद्दल केले हे मोठे वक्तव्य

Anant-Radhika Wedding : अंबानी परिवारातील धाकटी सून राधिकाने लग्नसोहळ्यासाठी घातली बहिणीची ज्वेलरी, सोशल मीडियावर चर्चा

PREV

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?