Ambedkar Jayanti 2025: दलित जीवनावर आधारित चित्रपट सामाजिक विषमतेवर प्रकाश टाकतात. 'Article 15' भेदभावाला विरोध करतो, 'जय भीम' न्यायासाठी संघर्ष दर्शवतो, तर 'मसान' जातीय भेदभावामुळे होणाऱ्या वेदना व्यक्त करतो.
अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘Article 15’ हा चित्रपट भारतीय संविधानातील १५व्या कलमावर आधारित आहे, जे जाती, धर्म, लिंग, वंश यावर आधारित भेदभावास प्रतिबंध करतो. दलित मुलींच्या अमानवी हत्या व त्यांच्या मागे उभा राहणारा तरुण पोलीस अधिकारी – ही कथा समाजातील विषमतेवर थेट बोट ठेवते. बाबासाहेबांच्या 'समतेच्या' विचारांना हा चित्रपट प्रखरपणे उजाळा देतो.
25
Jai Bhim (2021), 'शोषितांच्या लढ्याची खरी गाथा'
‘जय भीम’ हा चित्रपट तामिळनाडूतील एका सत्य घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये एक आदिवासी व्यक्ती पोलिसांच्या अत्याचाराचा बळी ठरतो. सुपरस्टार सुरिया यांनी वकिलाच्या भूमिकेत एका निर्दोष कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला संघर्ष पाहून डोळे पाणावतात. बाबासाहेबांच्या 'कायद्याने सर्वांना समान न्याय' या विचाराशी हा चित्रपट अगदी समर्पक आहे.
35
Dr. Babasaheb Ambedkar (2000), 'एका महामानवाचा जीवनप्रवास'
या चित्रपटात ममुट्टी यांनी बाबासाहेबांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट त्यांचा बालपण, शिक्षण प्रवास, सामाजिक संघर्ष, आणि शेवटी संविधान निर्मितीपर्यंतचा प्रवास प्रभावीपणे दाखवतो. बाबासाहेबांचं खऱ्या अर्थानं व्यक्तिचित्र पाहायचं असेल, तर हा चित्रपट नक्की पाहा.
‘जॉली LLB’ ही कथा एका साध्या वकिलाची आहे, जो एका मोठ्या वकिलाच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतो. गरिबांच्या बाजूने उभं राहणं, खऱ्याला न्याय मिळवून देणं – हे सर्व बाबासाहेबांनी मांडलेल्या 'न्याय' संकल्पनेशी संबंधित आहे. विनोद, व्यंग आणि वास्तव एकत्रितपणे मांडणारा हा चित्रपट सामाजिक संदेश देतो.
55
Masaan (2015), 'भावनांवर जात-पातचं ओझं'
‘मसान’ हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पात्रांच्या आयुष्याची कथा सांगतो, जी जातीय भेदभावामुळे विदीर्ण झाली आहेत. समाजाच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली व्यक्तींच्या भावना, प्रेम आणि निर्णय कसे कुचंबले जातात, हे या चित्रपटात सुरेखरीत्या मांडलं आहे. बाबासाहेबांच्या 'जातमुक्त भारत' या विचाराला हा चित्रपट एक सृजनात्मक अभिव्यक्ती आहे.