Jolly LLB3 च्या सेटवर अक्षय कुमारची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Published : May 11, 2024, 08:05 AM ISTUpdated : May 11, 2024, 08:09 AM IST
Akshay Kumar

सार

Jolly LLB- 3 Movie : बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमारची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी जॉली एलएलबी-3 सिनेमाच्या सेटवर मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Jolly LLB- 3 Movie : ‘बड़े मियां छोटे मियां’ सिनेमानंतर पुन्हा एकदा अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याचा आगामी सिनेमा ‘जॉली एलएलबी-3’ मध्ये झळकणार आहे. या सिनेमाचे शूटिंग सध्या सुरु झाले आहे. यासंदर्भातील BTS व्हिडीओ अक्षयने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केले होते. जॉली एलएलबी-3 सिनेमात अक्षयसोबत अरशद वारसीही झळकणार आहे. अशातच सिनेमाच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये अक्षयच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येतेय.

अक्षय कुमारला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
‘जॉली एलएलबी-3’ सिनेमाच्या सेटवरुन व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अक्षय कुमारच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. अक्षयने काळ्या आणि पांढऱ्या रंगातील चेक्सचे शर्ट आणि पांढऱ्या रंगातील पँट परिधान केली असून चाहत्यांसोबत अगदी उत्सुकतेने फोटो काढण्यासाठी उभा असल्याचे दिसून येत आहे. सिनेमाच्या सेटवर पोहोचलेल्या चाहत्यांना अक्षयने नाराज न करत काहींना ऑटोग्राफही दिले.

'जॉली एलएलबी-3' सिनेमात डबल कॉमेडी-ड्रामाचा धमाका
‘जॉली एलएलबी- 3’ सिनेमात अक्षय कुमार आणि अरशद वारसी एकत्रित काम करताना दिसून येणार आहेत. याआधी आलेल्या ‘जॉली एलएलबी’ मध्ये अरशद वारसीने जॉलीची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या दुसऱ्या पार्टमध्ये अरशद एवजी अक्षय कुमार जॉलीच्या भूमिकेत होता. पण सिनेमाच्या तिसऱ्या पार्टला अधिक धमाकेदार करण्यासाठी निर्मात्यांनी अरशद आणि अक्षय कुमार या दोघांनाही एकत्रित कास्ट केले आहे. अशातच सिनेमाची प्रेक्षकांकडून आतुरतेने वाट पाहिली जात आहे. सिनेमात अरशद वारसी, अक्षय कुमार, सौरभ शुक्ला, हुमा कुरैशीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

आणखी वाचा : 

रवि किशनबद्दलच्या आयुष्यातील न ऐकलेल्या गोष्टी

70+ असलेल्या या बॉलीवूड मॉम्सचे फिटनेस सिक्रेट काय ? जाणून घ्या

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!