होळी सणाला कुत्र्यांवर होणाऱ्या अत्याचारावर अभिनेत्री श्रद्धा कपूर संतप्त, दोषींच्या विरोधात कार्यवाही करण्याची केली मागणी

Published : Mar 25, 2024, 08:32 AM ISTUpdated : Mar 25, 2024, 08:35 AM IST
Shraddha Kapoor

सार

अभिनेत्री श्रद्धा कपूरने होळीच्या नावावर पशूंवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला आहे. नुकताच श्रद्धाने एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये होळीच्या नावावर पशूंसोबत अत्याचार केले जात असल्याचे दिसून आले आहे.

Bollywood :  बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे (Sharddha Kapoor) पाळीव प्राणी-पशूंवर फार प्रेम आहे. अभिनेत्रीचा स्वत: चा कुत्रा देखील असून त्याच्यासोबतचे काही फोटो आणि व्हिडीओही ती शेअर करते. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचे कुत्र्यांवर असणारे प्रेम दिसून येते. याशिवाय एखाद्याने पशूंसोबत गैरवर्तवणूक केल्यास श्रद्धा कपूर त्या गोष्टीवर नक्कीच बोलते. अशातच एका व्हिडीओवर श्रद्धा कपूरने संतप्त होत प्रतिक्रिया दिली आहे.

कुत्र्यांवर करण्यात येणाऱ्या अत्याचारामुळे श्रद्धा कपूर भडकली
श्रद्धा कपूरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काहीजण होळीच्या नावाखाली कुत्र्यांसोबत गैरवर्तवणूक करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओच्या क्लिपमध्ये एक व्यक्ती आपल्या कुत्र्यावर जबरस्तीने रंग फेकत असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने देखील तसेच केले आहे. यावरच श्रद्धा कपूर भडकली आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. श्रद्धा कपूरने व्हिडीओ शेअर करण्यासह कॅप्शनमध्ये लिहिले की, "तुम्ही एखाद्याला कुत्र्यांसंबंधित होळीवेळी गैरवर्तवणूक करताना पाहिल्यास कृपया त्यावर कार्यवाही करा."

श्रद्धा कपूरचा आगामी सिनेमा
श्रद्धा कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्री, 'तू झुठी मैं मक्कार' सिनेमात झळकली होती. आता श्रद्धाचा आगामी सिनेमा 'स्री-2' राजकुमार राव सोबत झळकणार आहे. याशिवाय श्रद्धाकडे काही प्रोजेक्ट्स असून त्याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा : 

दादरमध्ये एका व्यक्तीने केले गैरवर्तन, प्रिया बापटचा धक्कादायक खुलासा; नेमकं प्रकरण काय वाचा सविस्तर

शाहरुख खान आणि उर्फी जावेदची झाली भेट? सेल्फी फोटो शेअर केल्याने चाहते हैराण

श्वेता तिवारीच्या सौंदर्याची मुलीसोबत केली जाते तुलना, पलकने म्हटले...

PREV

Recommended Stories

Dhurandhar X Review : अ‍ॅक्शन पॅक्ड, मास एंटरटेनर.. 'धुरंधर' पाहून प्रेक्षक काय म्हणाले?
सुंदर कविता आणि रचना अपूर्ण राहिल्या, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल केला पश्चाताप