'नुवोस्तानांते नेनोदंताना' चित्रपटात त्रिशाच्या मैत्रिणीची भूमिका साकारून अर्चना प्रसिद्ध झाली. तिने काही चित्रपटांमध्ये हिरोईन म्हणूनही काम केले. 'मगधीरा'मध्ये राजामौलींनी तिला श्रीहरीच्या गर्लफ्रेंडची भूमिका ऑफर केली होती. ती खूप छोटी भूमिका होती. त्यावेळी हिरोईनच्या संधीची वाट पाहणाऱ्या अर्चनाने ही ऑफर नाकारली. त्यामुळे ही भूमिका सलोनीने केली. ती संधी गमावल्याचा आजही पश्चाताप होतो, असे अर्चनाने म्हटले. 'मी गर्वाने नाही, तर तेव्हा माझ्यात तेवढी समज नव्हती म्हणून नकार दिला. 'मगधीरा'नंतर राजामौलींनी सलोनीला 'मर्यादा रामण्णा'मध्ये मुख्य भूमिका दिली. मी 'मगधीरा' केला असता, तर ती संधी मला मिळाली असती,' असे अर्चना म्हणाली.