Thane Firing | जयनाथ पूर्णेकरांचा राजेंद्र-मीनाक्षी शिंदेंवर आरोप

Thane Firing | जयनाथ पूर्णेकरांचा राजेंद्र-मीनाक्षी शिंदेंवर आरोप

Published : Sep 30, 2026, 02:05 PM IST

ठाण्यातील मानपाडा-गणेश नगर परिसरात शिवसेना (UBT) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांचे भाऊ आणि माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. जयनाथ पूर्णेकर यांच्या म्हणण्यानुसार, प्रदीप पूर्णेकर यांच्या हालचालींवर गणेशोत्सवापासून रेकी सुरू होती. हल्ल्यापूर्वी प्रदीप पूर्णेकर त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत नवरात्रोत्सवाबाबत चर्चा करत होते. जयनाथ पूर्णेकर यांनी या प्रकरणात राजकीय वर्चस्वाचा मुद्दा असल्याचा दावा करत माजी महापौर राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली. हल्ल्यात सहा राऊंड फायरिंग झाल्याचा आणि प्रदीप पूर्णेकर यांना तीन गोळ्या लागल्याचा दावा त्यांनी केला. तसेच धारदार शस्त्रांनीही वार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील सूत्रधारासह सर्व दोषींना समोर आणून कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी जयनाथ पूर्णेकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

02:23FDA Maharashtra | संभाजीनगरात 4765 किलो खवा सदृश्य पदार्थ जप्त
21:11IIT Bombay, Student Sahil Wakode’s case | रवींद्र वाकोडे: साहिल प्रकरणी आरोपींना अटक करा
15:13Mumbai Cyber Crime | डिजिटल अरेस्ट रॅकेटमध्ये 6 अटक: मुंबई सायबर | Digital Arrest | Cyber Fraud
15:59विशाल अग्रवालांची मागणी, केतनला फास्ट ट्रॅकमध्ये न्याय द्या | KetanAgarwal | SiyaGoyal | PuneCase
03:25FDA Raid| सियाच्या वडिलांचे दुकान बंद |आम्हाला त्रास होतोय, फाशी दोषीला द्या | Ketan agarwal case
03:45Pune Ketan Case । Siya प्रकरणात Vipul Dushing यांनी मांडली बाजू | Hearing | Court
06:27Nasrapur निकालावर Ajay Misar यांची प्रतिक्रिया | POCSO | Verdict | Capital Punishment
03:13Pune Ketan Case ।केतन अग्रवाल प्रकरणात लोहगडवर घटनाक्रमाची पुनर्रचना | Lohagad Fort | Sia Goyal
05:28Pune Ketan Case । केतन अग्रवालला श्रद्धांजली देण्यासाठी शांतता मोर्चा