
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर गोळीबार प्रकरणात त्यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी नवे व्हिडिओ पुरावे समोर आणले आहेत. हे पुरावे वकील समीर हटले यांच्याकडे सोपवल्याचे त्यांनी सांगितले. एका व्हिडिओमध्ये आरोपी निखिल यादव बंदूक देताना दिसत असून राजेंद्र ऊर्फ राजा शिंदेही तिथे उपस्थित असल्याचा दावा त्यांनी केला. दुसऱ्या व्हिडिओच्या आधारे बंदूक नीट हाताळता न येणारी व्यक्ती गोळीबार कसा करू शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दुसरी बंदूकही दिसत नसल्याचे सांगत पुरावे असूनही अटक होत नसल्याबद्दल राम पूर्णेकर यांनी महाराष्ट्र पोलिसांवर नाराजी व्यक्त केली.