गुंतवणूकीवर उत्तम परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेसह काहीजणांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक, नवी मुंबईतील घटना

नवी मुंबईमध्ये 42 वर्षीय महिलेसह अन्य काही जणांची वगवेगळ्या गुंतवणूकीत उत्तम परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात तब्बल तीन कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत गुंतवणूकीच्या नावाखाली काही नागरिकांची तीन कोटी रूपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून नऊ जणांच्या विरोधात एफआयआर(FIR) दाखल केला आहे.

पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबद्दल अधिक माहिती देत म्हटले की, नवी मुंबईत एका 42 वर्षीय महिला आणि अन्य काहीजणांना वेगवेगळ्या गुंतवणूक योजनेत उत्तम परतावा दिला जाईल असे सांगत त्यांची 2.97 कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंतवणूकीच्या नावाखाली फसवणूक
सानपाडा पोलीस स्थानकातील एका अधिकाऱ्यांनी म्हटले की, आरोपींनी गेल्या तीन वर्षात महिला आणि अन्य काहीजणांना शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करण्यास सांगितली. यामधून आरोपींनी संपत्ती खरेदी केली. आरोपींना पीडित व्यक्तींनी गुंतवलेल्या पैशांवर उत्तम परतावा किंवा पैसे परत देता आले नाही.

अशातच नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात राहणाऱ्या 42 वर्षीय महिलेने रविवारी (28 जानेवारी) पोलिसात तक्रार दाखल केली. याच आधारावर पोलिसांनी नऊ व्यक्तींच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणात अधिक तपास केला जात असून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ऑनलाइन कामाच्या नावाखाली फसवणूक
पुण्याजवळील पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे शाखेने ऑनलाइन कामाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात पोलिसांनी राजस्थान, मध्य प्रदेशातून जवळजवळ 14 आरोपींना अटक केली होती. आरोपी नागरिकांना ऑनलाइन रिव्हू रेटिंगसारखी कामे देऊन त्यांची फसवणूक करायचे.

आणखी वाचा : 

Shocking! हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या नादात आरोपीकडून लागली संपूर्ण इमारतीला आग, 76 जणांचा मृत्यू

Crime News : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी नवी मुंबईतील शेफच्या विरोधात गुन्हा दाखल

बोरिवलीत पतंगीच्या मांजाने घेतला 21 वर्षीय तरुणाचा जीव, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल

Share this article