अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, सातत्याने तिसऱ्यांदा रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या प्राथमिक निवडणुकीत मिळाला विजय

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बुधवारी सातत्याने तिसऱ्यांदा रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या प्राथमिक निवडणुकीत विजय मिळाला आहे.

US presidential election 2024 :  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा बुधवारी (12 मार्च) सातत्याने तिसऱ्यांदा रिपब्लिकन पक्षाच्या (Republican Party) अध्यक्ष पदासाठीच्या प्राथमिक निवडणुकीत विजय झाला आहे. 

असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, याच्या काही तासानंतर जो बायडेन डेमोक्रेटिक पक्षाच्या (Democratic party) अध्यक्ष पदासाठी निवडले गेले. जॉर्जिया, मिसिसिपी आणि वॉशिंग्टनमध्ये विजय मिळवत ट्रम्प यांनी रिपब्लिक उमेदवार होण्यासाठी आवश्यक असलेल्या 1215 प्रतिनिधींचा आकडा पार केला. यानंतर डोनाल्ड ट्रम्प जुलैमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नामांकन औपचारिकपणे स्विकारणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे सुनिश्चित झालेय की, त्यांचा सामना अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत होणार आहे. जो बायडेन (Joe Biden) यांनी वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवाराच्या रुपात आपले नामांकन सुरक्षित केले आहे. अमेरिकेच्या मीडियानुसार, बिडेन यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदावाराच्य रुपात नामांकन मिळवण्यासाठी त्यांना 1968 प्रतिनिधींची आवश्यकता होती.

आणखी वाचा : 

Video : विमानाच्या उड्डाणानंतर वेगळे झाले चाक, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुढील पाच वर्षांमध्ये भारत जगाच्या विकासाचे कारण ठरेल, IMF चे भाकीत

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झालेल्या शहबाज शरीफ यांना PM नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

Share this article