Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग, पाकिस्तानात इंटरनेट सेवा बंद?

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. दाऊदला कराची येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Chanda Mandavkar | Published : Dec 18, 2023 1:17 PM IST / Updated: Dec 18 2023, 07:30 PM IST

Dawood Ibrahim in Karachi Hospital : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. दाऊदला खाण्यातून विष देण्यात आल्याचा रिपोर्ट समोर आला होता. यानंतर पाकिस्तानातील इंटरनेट सेवा बंद केली गेली. दाऊदला कराचीतील रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

आता समोर आलेल्या रिपोर्टनुसार दाऊदचा जीव वाचवता आला नाही. त्याची प्रकृती गंभीर होती. ज्या रुग्णालयात दाऊदला भरती केले होते तेथे कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली होती.

दाऊदला इब्राहिमला दोन दिवस आधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सूत्रांनुसार हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी दाऊदला भरती करण्यात आले होते तेथे तो एकटाच रुग्ण होता. तसेच रुग्णालयात भरती असणाऱ्या दुसऱ्या रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले होते. रुग्णालयातील मोठे अधिकारी, दाऊदवर उपचार करणारे डॉक्टर, वैद्यकीय टीम आणि दाऊदच्या निकटवर्तीयांनाच त्याच्या येथे जाण्यास परवानगी होती.

नातेवाईकांकडून घेतली जातेय माहिती

मुंबई पोलिसांकडून दाऊदबद्दलची माहिती त्याच्या नातेवाईकांकडून घेतली जात आहे. पोलीस दाऊदचे नातेवाईक अलीशाह पारकर आणि साजिद वागळे यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या मुलाने ANI ला सांगितले होते की, दाऊदने दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर तो कराचीत राहत आहे.

आणखी वाचा: 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विष देऊन मारण्याचा प्रयत्न, रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती

महिलेच्या डोळ्यातून काढले 60 जिवंत किडे, डॉक्टरांनाही बसला धक्का

US Shooting : लास वेगासमध्ये विद्यापीठात गोळीबार, तिघांचा मृत्यू - एकजण जखमी

Share this article