जपानमधील तैवान येथील हुआलियन येथे भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. याचे सध्या काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय तैवानला त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.
Taiwan Earthquake : तैवानची राजधानी ताइपे (Taipei) येथे बुधवारी (3 मार्च) 7.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे वीजपुरवठाही खंडीत झाला आहे. देशभरातील ट्रेन सेवाही बंद करण्यात आली आहे. भूकंपाचे झटके ऐवढे तीव्र होत की जपानमध्ये दोन बेटांवर त्सुनामीही आली आहे.
तैवानमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
तैवानच्या हुआलियन (Hualien) येथील काही भूकंपाचे फोटो आणि व्हिडओ समोर आले आहेत. यामध्ये इमारतीसह काही घरे कोसळली गेल्याचे दिसून येत आहे. भूकंपामुळे तैवानमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे फार मोठे नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर भूकंपाचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये एक पाच मजली इमारत भूकंपाच्या धक्क्यामुळे झुकली गेल्याचेही दिसून येत आहे.
भूकंपामुळे इमारतींमध्ये नागरिक अडकल्याची भीतीही व्यक्त केली जातेय. तैवान, जपान आणि फिलीपिन्स येथे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, भूकंपामुळे जीवतहानि झाल्याचे वृत्त नाही.
तैवानमधील सर्वाधिक मोठा भूकंप
सप्टेंबर, 1999 मध्ये तैवानमध्ये 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. यामध्ये 2400 नागरिकांचा मृत्यू झाला होता. खरंतर, जपानमध्ये वर्षभरात लहान-मोठे भूकंपाचे धक्के जाणवत राहतात.
आणखी वाचा :