तर महिलांना दगडाने ठचून मारणार... तालिबानच्या नेत्याचा पुन्हा एकदा फर्मान; अफिगाणिस्थानात महिलांना जगणे झाले मुश्किल

अधिक लोकाभिमुख सरकारचे आश्वासन देऊनही, तालिबानने पुन्हा एकदा सार्वजनिक फाशी आणि फटके मारण्यासारख्या कठोर शिक्षा सुरू केल्या आहेत.

 

अफगाणिस्तान : तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा याचा एक ऑडिओ मेसेज नुकताच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्याने म्हंटले आहे की, व्याभिचार करणाऱ्या अफगाण महिलांना चाबकाचे फटके आणि दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा पुन्हा एकदा देणार असल्याचे म्हंटले आहे.

तालिबानच्या या नेत्याने यावेळी त्यांचा पाश्चात्य लोकशाहीविरुद्ध लढा सुरूच राहील असेही जाहीर केले.

आपल्या ऑडिओ मेसेजमध्ये मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा पाश्चात्य अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाला की, जेव्हा आम्ही त्यांना दगडाने ठेचून मारू, तेव्हा तुम्ही याला महिलांच्या हक्कांचे उल्लंघन म्हणाल.पण आम्ही लवकरच व्यभिचाराच्या शिक्षेची अंमलबजावणी करू. आम्ही महिलांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे फटके मारू.तसेच त्यांना सार्वजनिक ठिकाणी दगडाने ठेचून ठार मारू. त्यासाठी आम्हाला कोणीच रोखू शकत नाही.

मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादाला सार्वजनिक पाहिलेले नाही :

अफगाणिस्तानचा सरकारी टीव्ही,आता तालिबानच्या नियंत्रणाखाली आहे. याद्वारे अखुंदजादा याचे व्हॉइस मेसेजेस प्रसारित केले जातात.तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता मिळवल्यापासून काही जुने फोट सोडले तर अखुंदजादाला कोणीही सार्वजनिकरित्या पाहिलेले नाही. तो तालिबानचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण कंदाहारमध्ये असल्याची माहिती सतत समोर येत असते.

महिलांमध्ये भीतीचे वातारण :

अधिक लोकाभिमुख सरकारचे आश्वासन देऊनही, तालिबानने पुन्हा एकदा क्रूर सार्वजनिक फाशी आणि फटके मारण्यासारख्या कठोर शिक्षा सुरू केल्या आहेत.त्यामुळे अफगाणमध्ये महिलांना मुक्त पणे जगणे मुश्किल झाले आहे.या सर्व परिस्थितीत महिलांमध्ये भीतीने वातावरण पसरले आहे.

संयुक्त राष्ट्राची टीका :

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी तालिबानवर जोरदार टीका करत देशाच्या राज्यकर्त्यांना अशा पद्धती थांबवण्याचे आवाहन केले आहे.आपल्या ऑडिओ मेसेजमध्ये अखुंदजादा म्हणाला की, आंतरराष्ट्रीय समुदाय ज्या महिलांच्या हक्कांसाठी वकिली करत आहे ते तालिबानच्या इस्लामिक शरियाच्या कठोर व्याख्याच्या विरोधात आहे. अखुंदजादाच्या या वक्तव्यामुळे अफगाणिस्तानमध्ये मध्ये संताप निर्माण झाला आहे. हे प्रकार रोकण्यासाठी काहींनी आंतरराष्ट्रीय समुदायाला तालिबानवर दबाव वाढवण्याचे आवाहन केले आहे.

आणखी वाचा :

इस्लामाबाद हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून पोलखोल, न्यायव्यस्थेसंदर्भातील कोणताही निर्णय घेण्यासाठी ISI दबाव टाकत असल्याचा आरोप

Layoffs in Argentina : अर्जेंटिनामध्ये 70 हजार शासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, राष्ट्रध्यक्ष जेव्हियर माइली यांचे संकेत

UK : विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीदरम्यान भारतीय विद्यार्थी सत्यम सुराणाच्या विरोधात द्वेश मोहीम सुरू, नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Share this article