इस्लामाबाद हायकोर्टातील न्यायाधीशांनी न्यायिक परिषदेला पत्र पाठवली आहे. यामध्ये आयएसआयवर न्यायव्यवस्थेच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप लावला आहे.
Pakistan : पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद हायकोर्टाच्या सहा न्यायाधीशांनी आयएसआयवर (ISI) न्यायव्यवस्थेच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप लावला आहे. यासंबंधित पत्रही न्यायिक परिषदेला पाठवले आहे. न्यायाधीशांनी म्हटले की, देशातील गुप्तचर एजेंसींकडून हायकोर्टावर वेगवेगळ्या प्रकारे दवाब टाकले जातात. यामुळे न्यायव्यवस्थेच्या कामकाजावर परिणाम होतो. हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी न्यायिक परिषदेकडे मदतीची मागणी केली आहे.
इस्लामाबाद हायकोर्टाने धाडले न्यायिक परिषदेला पत्र
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्लामाबाद हायकोर्टाच्या सहा न्यायाधीशांनी स्वाक्षरी करत न्यायिक परिषदेला एक पत्र पाठवले आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचीही मागणी हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी केली आहे. पत्रात स्वाक्षरी केलेल्या न्यायाधीशांमध्ये न्यायाधीश मोहसीन अख्तर कयानी, न्यायाधीस बाबर सत्तार, न्यायाधीश सरदार इजाज इशाक खान, न्यायाधीश तारिक महमूद जहंगिरी, न्यायाधीश समन रफत इम्तियाज आणि न्यायाधीश अरबाब मुहम्मद ताहिर यांच्या नावाचा समावेश आहे.
ISI वर गंभीर आरोप
खरंतर, ही मागणी सुप्रीम कोर्टाद्वारे इस्लामाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश अजीज सिद्दिकी यांना पदावरून हटवणे अवैध असल्याचे घोषित केल्यानंतर करण्यात आली आहे. एका भाषणादरम्यान, अजीज सिद्दीकी यांनी देशातील गुप्तचर एजेंसी ISI वर कोर्टाच्या कार्यवाहीत अडथळा निर्माण करण्याचा आरोप केला होता. यानंतर वर्ष 2018 मध्ये त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. या चिठ्ठीमध्ये हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी न्यायाधीश सिद्दीकी यांच्याद्वारे ISI बद्दल उपस्थितीत केलेल्या प्रश्नांवर तपासणी करण्याचीही मागणी केली आहे.
आणखी वाचा :