Ram Mandir Pran Pratishta : हिंदू धर्म मानणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मॉरिशस सरकारने 22 जानेवारी रोजी दोन तासांची विशेष सुटी जाहीर केली आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला आहे.
Ram Mandir Pran Pratishta : मॉरिशस सरकारने हिंदू धर्म मानणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान दोन तासांची विशेष सुटी जाहीर केली आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला आहे.
यानुसार 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून या कर्मचाऱ्यांना दोन तासांकरिता विशेष रजा देण्यात आली आहे. भारतामध्ये होणाऱ्या श्री राम मंदिराच्या भव्यदिव्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मॉरिशस सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले गेले आहे, ही ऐतिहासिक घटना आहे, कारण प्रभू श्री राम यांची अयोध्येमध्ये वापसी होत आहे.
देशभरात उत्साह
अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिराचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशपरदेशातील 7 हजारहून अधिक पाहुणेमंडळी उपस्थित राहणार आहेत. सर्व पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त सुमारे 4 हजार साधूसंतांनाही सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या दिवशी देशभरातील मंदिरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातील आणि पूजेचेही आयोजन केले जाणार आहे.
याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आता मॉरिशस सरकारने हिंदू धर्म मानणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांकरिता दोन तासांची विशेष सुटी जाहीर केल्याची मोठी घोषणा केली आहे.
आणखी वाचा
Ramcharitmanas : रामचरितमानसच्या मागणीत मोठी वाढ, छपाईसाठी गीता प्रेसमध्ये दिवसरात्र काम सुरू
राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मौनी बाबा सोडणार मौनव्रत, वयाच्या 10व्या वर्षी केला होता संकल्प
नाशिकमधील रोड शो ते काळाराम मंदिरापर्यंत, पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास PHOTO