US : पर्ड्यू विद्यापीठात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, अचानक झाला होता बेपत्ता

Published : Jan 30, 2024, 10:41 AM IST
Neel Acharya

सार

अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात शिकणारा भारतीय विद्यार्थी मृताव्यस्थेत सापडला आहे. नील आचार्य असे विद्यार्थ्याचे नाव असून 28 जानेवारीपासून तो बेपत्ता होता.

Crime News : अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात (Purdue University) शिकणारा भारतीय विद्यार्थी नील आचार्य याचा मृत्यू झाला आहे. नील गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता. मृत्यूनंतर आता नीलचा मृतदेह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सापडला आहे.

नील आचार्य बेपत्ता झाल्याची सूचना रविवारी (21 जानेवारी) सोशल मीडियावर देण्यात आली होती. नील पर्ड्यू विद्यापीठातील जॉन मार्टिसन ऑनर्स कॉलेजमध्ये संगणक विज्ञान आणि डेटा विज्ञानचे शिक्षण घेत होता. रिपोर्ट्सनुसार, सोमवारी (29 जानेवारी) विद्यापीठाच्या कंप्युटर सायन्स विभागाला लिहिलेल्या एका ई-मेलमध्ये अंतरिम सीएस प्रमुख ख्रिस क्लिफ्टन यांनी नील आचार्य याच्या मृत्यूबद्दलची माहिती प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांना दिली.

ई-मेलमध्ये काय लिहिले होते?
ई-मेलमध्ये लिहिण्यात आले होते, "मोठ्या दु:खाने तुम्हाला सांगत आहे की, आपला एक विद्यार्थी नील आचार्य याचे निधन झाले आहे. माझ्या संवेदना त्याचे मित्र, परिवार आणि सर्वांसोबत आहेत."

आईने नीलला शोधण्याची केली होती विनंती
नील आचार्य याची आई गौरी आचार्य यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X'वर सोमवारी (29 जानेवारी) एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये गौरी आचार्य यांनी आपला मुलगा नील बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. नील 28 जानेवारीपासून बेपत्ता असल्याचे म्हटले होते. याशिवाय पोस्टमध्ये नीलचा शोध घ्यावा अशी विनंती देखील केली होती.

नील अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात शिकत असून त्याला शेवटचे एका उबर चालकाने पाहिल्याचेही गौरी आचार्य यांनी पोस्टमध्ये म्हटले होते. तुम्हाला नीलबद्दल काही माहिती असल्यास आम्हाला मदत करावी अशी विनंतीही नीलच्या आईने पोस्टमध्ये केली होती.

गौरी आचार्य यांनी केलेल्या पोस्टवर शिकागोमधील भारतीय वाणिज्य दूतवासाने म्हटले की, वाणिज्य दूतवास पर्ड्यू विद्यापीठातील अधिकारी आणि नीलच्या परिवारासोबत संपर्कात आहेत. वाणिज्य दूतवासाकडून सर्व शक्य सहकार्य आणि मदत केली जाईल.

दोन भारतीय विद्यार्थ्यांचे मृत्यू
गेल्या आठवड्यात अकुल धवन नावाचा विद्यार्थी मृताव्यस्थेत सापडला होता. अकुल इलिनॉय विद्यापीठात (Illinois university) इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी आला होता. याशिवाय काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील जॉर्जियात एका बेघर व्यक्तीने भारतीय विद्यार्थी विवेक सैनी याच्या डोक्यात हातोड्याने वार करत त्याची हत्या केली होती.

आणखी वाचा : 

BRICS : भारत-रशिया लवकरच डिजिटल अर्थव्यवस्था तयार करणार, असा पूर्ण होणार अजेंडा

Shocking! हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या नादात आरोपीकडून लागली संपूर्ण इमारतीला आग, 76 जणांचा मृत्यू

Mynmar Army Aircraft Crashes : लेंगपुई विमानतळावर मान्यमार सैन्याच्या विमानाला अपघात, सहा जण जखमी

PREV

Recommended Stories

बांगलादेशी नागरिकाने भारतीय विद्यार्थिनींची काढली छेड, लोकांमध्ये संताप (WATCH)
पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांना मिळाली 'असीम' शक्ती, बनले पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस!