North Korea : किम जोंग उन यांना अश्रू अनावर, देशातील महिलांना केली ही विनंती! पाहा VIDEO

North Korea King: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी देशातील महिलांना अधिक मुलं जन्माला घालण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर किम जोंग उन हे भावूक झाले आणि त्यांना आपले अश्रू अनावर झाले. याचाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Chanda Mandavkar | Published : Dec 7, 2023 9:34 AM IST / Updated: Dec 07 2023, 05:03 PM IST

North Korea Mother's Meet : उत्तर कोरियातील महिलांनी अधिक मुले जन्माला घालावी, असे आवाहन येथील हुकूमशाह किम जोंग उन यांनी केले आहे. खरंतर उत्तर कोरियात मुलांचा जन्मदर कमी होत चालल्याने किम जोंग उन हे चिंतेत आहे. याच संदर्भात महिलांशी संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

प्योंगयांगमध्ये मातांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात किम जोंग उन यांनी असे म्हटले की, “जन्मदरात होणारी घट कमी करणे आणि मुलांची उत्तम काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.”

किम जोंग यांनी उत्तर कोरियात घटत असलेल्या जन्मदारावर तोडगा काढण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये किम जोंग उन हे आपले अश्रू पुसत असल्याचे दिसतेय. तसेच कार्यक्रमातील उपस्थितीतांपैकी काहींना देखील आपले अश्रू अनावर झाले.

उत्तर कोरियाचा प्रजनन दर 1.8 टक्के
संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, वर्ष 2023पर्यंत उत्तर कोरियामध्ये प्रजनन दर किंवा प्रत्येक महिलेपाठोपाठ जन्माला आलेल्या बाळांची सरासरी संख्या 1.8 टक्के इतकी आहे. अलिकडल्या काही वर्षात एकूणच जन्मदरात घट झाली आहे.

दक्षिण कोरियाचा प्रजनन दर 0.78 टक्के
उत्तर कोरियाच्या शेजारी असणारा देश दक्षिण कोरियातही प्रजननाचा दर घटत चालला आहे. दक्षिण कोरियापेक्षा उत्तर कोरियाचा प्रजनन दर उत्तम आहे. दक्षिण कोरियात गेल्या वर्षात प्रजनन दरात घट होऊन तो 0.8 टक्क्यांच्या खाली गेला आहे. 

जपानमध्ये हीच आकडेवारी कमी होऊन 1.26 टक्क्यांवर आली आहे. दक्षिण कोरियात घटत असलेल्या जन्मदरामुळे बालरोग तज्ज्ञांची कमतरता भासत आहे. दक्षिण कोरियातील लोकांना लग्न करणे आणि मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. 

उत्तर कोरियात अन्नटंचाईची समस्या
उत्तर कोरियाची लोकसंख्या 2.5 कोटी आहे. येथील लोकांना अलिकडल्या काही दशकांमध्ये अन्नटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागला होता. येथे 1990 च्या दशकात भयंकर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. याचसोबत पूर येण्यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा देखील सामना करावा लागतो. यामुळे शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

आणखी वाचा: 

US Shooting : लास वेगासमध्ये विद्यापीठात गोळीबार, तिघांचा मृत्यू - एकजण जखमी

China Pneumonia Outbreak : चीनमध्ये फैलावतोय नवा गंभीर VIRUS, भारतावर होणार परिणाम?

Israel-Hamas War : नागीण फेम अभिनेत्रीच्या बहीण-भावोजीची हमासच्या दहशतवाद्यांनी केली निर्घृण हत्या,मुलांसमोरच घेतला जीव

Share this article