Japan Airlines plane Accident : टोकियो शहरातील हानेदा विमानतळावर विमानाचा भीषण अपघात घडला. लँडिंगदरम्यानच विमानाला भीषण आग लागली. या विमानामध्ये जवळपास 300 प्रवासी असल्याचे म्हटले जात आहे.
Japan Airlines plane Accident : जपान देशाची राजधानी टोकियो शहरातील हानेदा विमानतळावर भीषण अपघात घडला आहे. येथे जपान एअरलाइन्सचे विमान लँड होत असताना अचानक भीषण आग लागली.
क्षणार्धातच आगीने रौद्ररूप धारण केले. या विमानात जवळपास 300 प्रवासी असल्याचे म्हटले जात आहे.
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विमानाला भीषण आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते. शिवाय धावपट्टीवरही आग लागली होती.
दरम्यान या भीषण विमान अपघातातील मृतांच्या संख्येबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. अग्निशमन दलाच्या पथकाला विमानाला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एअरबस A350 जपान एअरलाइन्सचे फ्लाइट JL516 या विमानाचा अपघात झाल्याची माहिती आहे. धावपट्टीवर कोस्टल गार्डच्या विमानाशी टक्कर झाल्याने दुर्घटना घडल्याचे म्हटले जात आहे.
आणखी वाचा :
Japan Earthquake : साऊथ स्टार ज्युनिअर NTR थोडक्यात बचावला, भूकंपापूर्वी परतला मायदेशी