पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार, 87 जणांचा मृत्यू तर अनेक गावे पाण्याखाली

Pakistan Rains : दुबईनंतर आता पाकिस्तानातला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 87 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय काही गावात पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

Chanda Mandavkar | Published : Apr 20, 2024 3:46 AM IST

Pakistan Rains : पाकिस्तानात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 87 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अनेक गावेही पाण्याखाली गेली आहेत. शासनाकडून पुरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक घरे पाण्याखाली
पावसामुळे पाकिस्तानातील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. एनडीएमएच्यानुसार, पाकिस्तानातील जवळजवळ 2700 घरे पावसामुळे कोसळली गेली आहेत. काही ठिकाणी घरे कोसळल्याने बेघर झालेल्या नागरिकांना शेल्टर होममध्ये हलवण्यात आले आहे.

87 जणांचा मृत्यू तर 80 हून अधिक जण जखमी
पाकिस्तानातील प्रशासनानुसार, पावसामुळे पाकिस्तानात आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये 87 जणांचा मृत्यू तर 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. असे सांगितले जातेय की, बहुतांश मृत्यू अंगावर वीज पडून, घर कोसळणे आणि पुरात वाहून गेल्याने झाले आहेत. सध्या पाकिस्तानच्या सरकारकडून नागरिकांना मदत केली जात आहे.

आणखी वाचा :

Israel Iran Conflict : इस्रायलचा इराणवर हल्ला, इस्फहान शहरातील विमानतळावर मोठा स्फोट

Dubai Rains : दुबईत पावसाचा हाहाकार, विमानतळ पाण्याखाली जाण्यासह ओमानमध्ये 18 जणांचा मृत्यू

Share this article