आजारी आलेल्या मालकाला पाहण्यासाठी चक्क हत्ती आला रुग्णालयात, पाहा Viral Video

Published : Mar 15, 2024, 05:41 PM ISTUpdated : Mar 15, 2024, 05:44 PM IST
elephant 0

सार

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती आपल्या आजारी असलेल्या मालकाला पाहण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्याचे दिसून येत आहे.

Viral Video :  सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या गोष्टींचे फोटो-व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती आपल्या आजारी असलेल्या मालकाला भेटण्यासाठी थेट रुग्णालयात पोहोचल्याचे दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओला आजवर अनेकांनी पाहिले असून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही त्यावर देण्यात आल्या आहेत.

गुडघ्यांवर बसून रुग्णालयात आला हत्ती
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हत्ती आपल्या मालकाला भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाला. पण आपल्या अवाढ्यव अंगामुळे हत्ती चक्क गुडघ्यांवर बसून रुग्णालयात मालकाला पाहायला आला. हत्ती आणि त्याच्या मालकामधील हे नाते पाहून अनेकजण भावूक झाले आहेत.या व्हिडीओच्या माध्यमातून मानव आणि पशूमधील नाते किती सखोल असू शकते हे दिसून येत आहे.

नेटकऱ्यांच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हत्तीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हत्तीचा भावूक व्हिडीओ आतापर्यंत 78 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी पसंत केला आहे.

आणखी वाचा : 

भारतातील पहिलीच अंडरवॉटर मेट्रो पाहून पाकिस्तानी नागरिक हैराण, दिल्या अशा प्रतिक्रिया (Watch Video)

Video : विमानाच्या उड्डाणानंतर वेगळे झाले चाक, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पाकिस्तानमधील महिलेच्या ड्रेसवरुन भडकले नागरिक, जमावाने मागणी करत म्हटले..... (Watch Video)

PREV

Recommended Stories

बांगलादेशी नागरिकाने भारतीय विद्यार्थिनींची काढली छेड, लोकांमध्ये संताप (WATCH)
पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांना मिळाली 'असीम' शक्ती, बनले पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस!