BRICS : भारत-रशिया लवकरच डिजिटल अर्थव्यवस्था तयार करणार, असा पूर्ण होणार अजेंडा

ब्रिक्स देशांमध्ये जागतिक स्तरावर संबंध वाढण्यासाठी भारत आणि रशियाने डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. यासाठी दोन्ही देशांमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी भागीदारी झाली आहे.

BRICS : भारत (India) आणि रशियाने (Russia) डिजिटल अर्थव्यवस्था (Digital Economy) निर्माण करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर अधिक जोर दिला आहे. ब्रिक्स देशांमध्ये जागतिक स्तरावर संबंधांचा होणारा विस्तार पाहाता भारत आणि रशियाने डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांमध्ये यासाठी एक भागीदारी देखील झाली आहे.

चलनासंबंधित लवकरच घेतला जाणार निर्णय
ब्रिक्स देशांमधील  चलन ब्लॉकचेनवर आधारित असेल अशी अफवाही पसरली आहे. असे मानले जात आहे की, यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात आणखी कामांना फायदा होऊ शकतो. अशातच रशिया आणि भारताकडून डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी प्रयत्न केला जाणार आहे.

 

 

रशिया आणि भारत करणार डिजिटल अर्थव्यवस्थेचा विकास
यंदाच्या वर्षात (2024) सर्वांचे लक्ष ब्रिक्सच्या चलनाच्या विकासाकडे लागून राहिले आहे. दरम्यान, या संबंधित अधिक माहिती मिळालेली नाही. पण अशी अफवा आहे की, ब्रिक्स देशांमध्ये चलनासंबंधित काम सुरू आहे.

ब्रिक्समध्ये या देशांचा समावेश
ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण अफ्रिका या देशांच्या आद्याक्षरांवरुन ‘ब्रिक्स’ असे नाव या देशांच्या गटाला दिले गेले. गेल्या वर्षात ऑगस्ट (2023) मध्ये दक्षिण आफ्रिकेत (South Africa) पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेच्या शेवटच्या दिवशी अर्जेंटिना, इराण, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिराती, इजिप्त आणि इथिओपिया अशा सहा देशांचा ब्रिक्समध्ये समावेश केल्याची घोषणा करण्यात आली होती.

आणखी वाचा : 

तुम्ही मुलांना कारच्या खिडकीजवळ बसवता का? नक्की पाहा अंगावर काटा आणणरा VIDEO

Canada : विमान उड्डाणाआधीच प्रवाशाने केबिनचा दरवाजा उघडत मारली उडी, व्यक्ती जखमी

UAE मधील हे नियम माहितीयेत का? कायदे मोडणाऱ्याला मिळते कठोर शिक्षा

Share this article