AstraZeneca कंपनीने जगभरातून परत मागवून घेतला कोविशिल्ड लसीचा साठा, नक्की कारण काय?

COVID19 Vaccine : कोविशिल्ड लसीची निर्मिती करणारी कंपनी ॲस्ट्राझेन्काने आपल्या लसीचा साठा जगभरातून परत मागवून घेण्यास सुरुवात केली आहे. यामागील नक्की कारण काय? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....

COVID19 Vaccine : कोविशिल्ड लसीवरुन सध्या वाद सुरू आहे. अशातच लसीची निर्मिती करणाऱ्या ॲस्ट्राझेन्का (AstraZeneca) कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटले की, आम्ही जगभरातून कोविशिल्ड लसीचा (Covidshield Vaccine) साठा परत मागवण्याची सुरुवात केली आहे. दरम्यान, कंपनीने लसीमुळे आरोग्यावर कोणतेही परिणाम होत नाहीत असे म्हटले आहे. खरंतर लसीचा साठा अत्याधिक प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध असल्याने परत मागवून घेण्याचा निर्णय घेतल्याचे ॲस्ट्राझेन्का कंपनीने स्पष्टीकरण दिलेय.

कधी घेतलाय कंपनीने निर्णय?
रिपोर्ट्सनुसार, लसीच्या साठा परत मागवून घेण्याचा निर्णय 5 मे रोजी घेण्यात आला होता. याबद्दलची प्रक्रिया 7 मे पासून सुरू करण्यात आली. अशातच मंगळवारी कंपनीने युरोपातील लसीचे वितरणही थांबवले आहे.

नक्की काय आहे प्रकरण?
गेल्या काही दिवसांपूर्वी ॲस्ट्राझेन्का कंपनीने आपल्या लसीमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात असे कोर्टासमोर मान्य केले होते. खरंतर, लसीमुळे फार कमी जणांवर दुष्परिणाम झाल्याचा दावाही कंपनीने केला होता. याच संदर्भात जॅमी स्कॉटने खटला दाखल केला होता. त्यांनी एप्रिल 2021 मध्ये एस्ट्राजेनेका लस घेतली होती. यानंतर जॅमींना मेंदूसंबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे.

लसीमुळे शरिरावर असे झाले परिणाम
जॅमी स्कॉट यांच्यासह अन्य रुग्णांच्या प्रकरणांमध्ये थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसह (Thrombocytopenia Syndrome) थ्रोम्बोसिस (Thrombosis) नावाच्या दुर्मिळ परिणामाची बाब समोर आली. या सिंड्रोममुळे रक्तात गुठळ्या तयार होणे आणि शरिरातील पेशी कमी होण्याची समस्या निर्माण होते. एस्ट्राजेनेका कंपनीकडून युकेमधील उच्च न्यायालायत सादर करण्यात आलेल्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये म्हटलेय की, लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसारखे परिणाम शरिरावर होऊ शकतात. पण याची शक्यता फार कमी देखील आहे.

भारतात कोविशील्ड नावाने लसीची विक्री
एस्ट्रेजेनेका कंपनीने भारत सरकारला कोरोनाच्या काळात लसीचा पुरवठा केला होता. यासाठी कंपनीने जगभरातील सर्वाधिक मोठी लस निर्माता कंपनी सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता. सीरम इंस्टिट्युटसह मिळून कोविशील्ड नावाची लस कोरोनावर मात करण्यासाठी तयार करण्यात आली होती. याशिवाय भारतातील नागरिकांना कोरोनाच्या काळात कोविशील्ड लसच दिली गेली होती.

आणखी वाचा : 

इस्रायलने बंद केले ‘अल जझीरा’ची कार्यालये ; नेतान्याहू सरकारचा आदेश

पाकिस्तानच्या तुरुंगात असणाऱ्या पालघरमधील मच्छिमाराचा मृत्यू, नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Share this article