इस्रायलने बंद केले ‘अल जझीरा’ची कार्यालये ; नेतान्याहू सरकारचा आदेश

‘अल जझीरा’आणि इस्रायलमधील नेतान्याहू सरकारदरम्यान दीर्घकाळ तणाव होता. त्या पार्श्वभूमीवर आधी नेतान्याहू सरकारच्या मंत्रिमंडळाने ‘अल जझीरा’चे स्थानिक कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. कार्यालयावर छापा टाकून तिथे तपासणी करण्यात आली.

इस्रायल आणि गाझा संघर्षादरम्यान अल जझीरा वृत्तवाहिनीकडून गाझामधील दृश्य जगासमोर मांडले गेले. तेव्हा पासून इस्रायल आणि ‘अल जझीरा’ नेतान्याहू सरकारदरम्यान तणाव पाहायला मिळाला आहे.यावरून नेत्यानाहू सरकारने मंत्रिमंडळात ‘अल जझीरा’चे स्थानिक कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्थानिक कार्यालयावर छापा टाकत तेथील तपासणी देखील केली गेली. यामध्ये कार्यालयातील सर्व सामान जप्त करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे इस्रायलचा ‘अल जझीरा’विरुद्ध चाललेला संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वास्तविक, इस्रायलने गाझा युद्धात अल-जझीरा वाहिनीवर पक्षपाती वार्तांकन केल्याचा आरोप केला आहे. चॅनल आणि नेतान्याहू सरकारमधील संबंध फार पूर्वीपासून ताणले गेले आहेत. गाझा युद्धादरम्यान अल-जझिराने गाझामधील भीषण परिस्थिती आपल्या वाहिनीवर प्रसारित केली.अल जझीराने इस्रायलवर अत्याचार केल्याचा आरोप करत हवाई हल्ले आणि गर्दीने भरलेल्या रुग्णालयांची ग्राफिक प्रतिमा प्रसारित केली. इस्रायलने अल जझीरावर हमाससोबत काम केल्याचा आरोप केला आहे. या वृत्तवाहिनीचे प्रसारण मुख्यालय दोहा आहे. कतारी सरकार यासाठी निधी देते.

इस्रायल आणि अल जझीरा संबंध :

इस्रायलचे ‘अल जझीरा’शी फार पूर्वीपासून चांगले संबंध नाहीत. त्यामुळे इस्रायलने त्यांच्याविरुद्ध पक्षपाताचा आरोप केला आहे. ‘अल जझीरा’ या युद्धादरम्यान गाझामधील वाईट परिस्थिती संपूर्ण जगासमोर मांडली . गाझावर झालेले हवाई हल्ले आणि रुग्णालयांमधील मन हेलावणारे दृश्य त्यांनी प्रसारित केली होती. यामुळे दोघांचे संबंध आणखीनच खराब झाले आहे.

अलजझीराचे स्पष्टीकरण - आमचा हमासशी संबंध नाही

खुद्द अल जझीराने इस्त्रायलमधील त्याच्या प्रसारणावर बंदी घालण्याची पुष्टी केली आहे. इस्रायलच्या दूरसंचार मंत्र्यांनी कॅमेरे, मायक्रोफोन, सर्व्हर आणि लॅपटॉप तसेच वायरलेस ट्रान्समिशन जप्त करण्याचे आदेश दिल्याची माहिती वाहिनीने दिली आहे. त्यांच्या पत्रकारांचे फोनही जप्त करण्याचे आदेश आहेत.मंत्रिमंडळाचे आरोप निराधार असल्याचे सांगत अल जझीराने लिहिले की, त्याचा हमासशी कोणताही संबंध नाही. वाहिनीने याआधीही या आरोपांना उत्तर दिले आहे. इस्रायलच्या या निर्णयामुळे युद्ध थांबवण्याच्या कतारच्या प्रयत्नांवर परिणाम होऊ शकतो, असेही वाहिनीने म्हटले आहे. इस्त्रायलचे कतारसोबतचे संबंध बिघडण्याचा धोकाही असू शकतो.

Share this article