गेल्या वर्षी मिस यूएसए बनलेल्या नोएलिया वोइगटने अचानक पद सोडले?

Published : May 07, 2024, 03:24 PM IST
noelia voitgot

सार

2023 मध्ये मिस यूएसए बनलेल्या 24 वर्षीय नोएलिया व्होईग्ट मानसिक आरोग्याचे कारण देत आपल्या मिस यूएसए जबाबदारीवरून पायउतार केली आहे. हा निर्णय आपल्या मानसिक आरोग्याच्या हिताचा असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे हे सांगितले आहे.

नवी दिल्ली : मन चंगा कठौती में गंगा' या म्हणी प्रमाणे, माणसाचे मानसिक आरोग्य चांगले असेल तरच तो आपल्या कामात लक्ष देऊ शकेल.असाच एक प्रकार अमेरिकेतून समोर आला आहे. 2023 मध्ये मिस यूएसए बनलेल्या 24 वर्षीय नोएलिया व्होईग्ट मानसिक आरोग्याचे कारण देत आपल्या मिस यूएसए जबाबदारीवरून पायउतार केली आहे. हा निर्णय आपल्या मानसिक आरोग्याच्या हिताचा असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे हे सांगितले आहे.

72 वी मिस यूएसए पदावरून पायउतार :

इन्स्टाग्रामवर तिच्या राजीनाम्याची घोषणा करताना, नोएलिया व्होइग्टने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले, "मला जाणवले की हा अनेकांसाठी मोठा धक्का असू शकतो. तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी कधीही तडजोड करू नका असे म्हणत तिने पोस्टमध्ये शेअर केली आहे.

नोएलियाने पुढे लिहिले, "मला खोलवर माहित आहे की ही माझ्यासाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. मला आशा आहे की मी इतरांना मजबूत होण्यासाठी, त्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहन करेल.." भविष्यात काय घडेल याची मला कधीही भीती वाटणार नाही, मग ते कितीही अनिश्चित असले तरीही चालणार आहे.

विजेत्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य :

72 वी मिस यूएसए विजेती म्हणून नोएलिया व्होइग्टला मुकुट देण्यात आला होता. मिस यूएसए जिंकणारी ती पहिली व्हेनेझुएलन-अमेरिकन महिला होती. मिस यूएसए ऑर्गनायझेशनच्या प्रवक्त्याने सीएनएनला सांगितले की, ते व्होइग्टच्या तिच्या पदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाचे समर्थन करत म्हणाले की , "आमच्या जेतेपद विजेत्यांचे कल्याण हे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि आम्हाला समजते की त्यांनी यावेळी स्वतःला प्रथम स्थान देणे आवश्यक आहे." त्यांच्या जागी अन्य कोणाला तरी ही जबाबदारी देण्याबाबत आढावा घेत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. लवकरच नव्या मिस यूएसएची घोषणा करणार केली जाईल.

संस्थेने इंस्टाग्राम पोस्टमध्ये मॉडेलला आपला पाठिंबा व्यक्त केला आणि लिहिले, "नॉलिया, मिस यूएसए म्हणून तुमच्या सेवेबद्दल धन्यवाद. या पुढील प्रकरणासाठी तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत.

PREV

Recommended Stories

पाकिस्तानी महिलेची PM मोदींकडे मदतीची याचना, पती भारतात करतोय दुसरे लग्न!
बांगलादेशी नागरिकाने भारतीय विद्यार्थिनींची काढली छेड, लोकांमध्ये संताप (WATCH)