नवीन वर्षाला ५ लाखात कार घ्यायचीय, आता गाड्यांचे झकास पर्याय पाहून करा निवड

Published : Dec 02, 2025, 10:00 AM IST

हा लेख मारुती अल्टो K10, एस-प्रेसो, रेनॉल्ट क्विड, वॅगनआर आणि डॅटसन रेडी-गो यांसारख्या बजेट-फ्रेंडली गाड्यांची माहिती देतो. या गाड्या कमी मेंटेनन्स, चांगले मायलेज आणि शहरात चालवण्यासाठी सोप्या असल्याने लोकप्रिय आहेत. 

PREV
16
नवीन वर्षाला ५ लाखात कार घ्यायचीय, आता गाड्यांचे झकास पर्याय पाहून करा निवड

नवीन वर्षात गाडी घ्यायचा आपण विचार केला असेल पण बजेट कमी असेल तर काळजी करू नका. आपल्यासाठी ५ लाखांच्या बजेटमध्ये कोणत्या गाड्या खरेदी करता येतील त्याचीच माहिती जाणून घेऊयात.

26
Maruti Alto K10

मारुती अल्टो या कारचा आतापर्यंत सर्वात जास्त सेल झाला आहे. हि गाडी वजनाला हलकी असून मायलेज चांगलं देते. १.० L इंजिनसोबत शहरात चालवायला खूप सोपी अशी हि गाडी आहे. या गाडीला मेंटेनन्स कमी लागतो. 

36
Maruti S-Presso

मारुतीची एस प्रेसो हि गाडी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रेंड करताना दिसून येत आहे. हि गाडी पार्किंग करायला एकदम सोपी अशा स्वरूपाची आहे. कॉम्पॅकट साईजमध्ये एसयूव्ही सारखा या गाडीत लूक येतो. यामध्ये आरामदायी स्पेस असून मायलेज देखील चांगला मिळतो.

46
Renault Kwid

क्विड गाडीला स्टायलिश डिझाईन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळणारी बजेट कार म्हणून ओळखलं जातं. १.० L इंजिनमुळे परफॉर्मन्सही ठीक मिळतो. गाडी पार्किंग करायला कमी जागा लागत असल्यामुळं चिंता करण्याची आवश्यकता नाही.

56
Maruti WagonR

मारुती वॅगन आर हि गाडी प्रसिद्ध आहे. या गाडीमध्ये 1.0L आणि 1.2L इंजिन ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. या गाडीला मायलेज अंदाजे २२ ते २५ किलोमीटरच्या दरम्यान पडत असतं. गाडीचा मेंटेनन्स कमी असून कमी किंमतीत पार्ट उपलब्ध होऊन जातात.

66
Datsun Redi-Go

Datsun Redi-Go हि गाडी अतिशय बजेटमध्ये उपलब्ध होऊन जाते. 0.8L आणि 1.0L इंजिन या गाडीमध्ये देण्यात आलं असून गाडीची कॉम्पॅक्ट पण स्टाईलिश डिझाईन तिला खास बनवते. या गाडीला मायलेज अंदाजे २० ते २२ किलोमीटरचे मिळते.

Read more Photos on

Recommended Stories