एल निनोचं संकट होणार कमी; भारतात चांगला पाऊस कधी कोसळणार?

Published : Jun 14, 2026, 12:13 PM IST
el nino

सार

प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. मात्र, जपान आणि अमेरिकेच्या संस्थांनी दिलासादायक माहिती दिली असून, हिंदी महासागरात 'इंडियन ओशन डायपोल' (आयओडी) सकारात्मक होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पावसाची तूट भरून निघू शकते.

प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झालं असून १९५० नंतरचे सर्वात भयानक प्रभाव यामुळं होणार असल्याचं अमेरिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. याचा थेट परिणाम हा भारतातील आणि महाराष्ट्रातील पावसावर होत आहे. यामुळं पावसाचं प्रमाण कमी होणार असून दुष्काळाचे सावट वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण पसरलं 

यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. याचदरम्यान, जपान आणि अमेरिकेच्या संस्थांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात आयओडी सकारात्मक होण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर पावसाची तूट भरून निघू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मान्सूनबाबत नेमकं काय होणार? 

मान्सूनबाबत आता नेमकं काय होणार हे आपण समजून घेणार आहोत. याबाबत जपान आणि अमेरिका येथील संस्थांनी सकारात्मक माहिती दिली आहे. जपानी हवामानशास्र संस्था आणि अमेरिका येथील 'नॉर्थ अमेरिकन मल्टी मॉडेल एन्सेम्बल' जुलैमध्ये हिंदी महासागरातील तटस्थ स्थिती बदलून पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऑगस्टपासून काय वाढणार? 

ऑगस्ट महिन्यापासून 'पॉझिटिव्ह आयओडी'ची तीव्रताही वाढू शकते. भविष्यात बाष्पामुळे चांगला पाऊस होतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून दाखल होण्यासाठी २० जून हि तारीख उजडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मान्सून सध्या रत्नागिरीमध्ये रेंगाळला असून कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाला. त्यानंतर मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात केली जाणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

मंगळसूत्र ब्रेसलेटच्या डिझाईन पाहून जाल हरखून, फोटो पाहिले का?
१ ग्रॅममध्ये गोल्डचे पेंडंट करा खरेदी, डिझाईन पाहून जाल हरखून