WhatsApp चे नवे धमाकेदार फीचर, Voice च्या माध्यमातून फोटो Edit करता येणार

WhatsApp कडून लवकरच वॉइस कमांडच्या माध्यमातून फोटो ए़डिट करता येणार आहे. रियल-टाइम वॉइस मोडच्या मदतीने मेटा एआयसोबत संवाद साधत फोटो एडिट करता येऊ शकतात.

Chanda Mandavkar | Published : Oct 1, 2024 7:26 AM IST / Updated: Oct 01 2024, 12:57 PM IST

WhatsApp New Feature : मेटाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर एक धमाकेदार फीचर लवकरच युजर्ससाठी रोलआउट केले जाणार आहे. मेटा एआयला वॉइस कमांड देऊन फोटो एडिट करता येऊ शकते. रियल टाइम वॉइस मोडच्या माध्यमातून मेटा एआयसोबत संवाद साधून एडिट करू शकता. व्हॉट्सअ‍ॅप च्या बीटा वर्जनमध्ये गेल्या काही काळापासून दिसत असलेले वॉइस मोड फीचर लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर
मेटा एआयला (META AI) वॉइस कमांड देऊन उत्तर मिळण्याची सुविधा आधीपासूनच व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध आहे. अशातच कंपनीने वॉइस कमांडच्या माध्यमातून फोटो एडिट करण्याची सुविधा युजरला देण्याचा विचार केला आहे. फोटोला मेटा एआयसोबत शेअर करत चॅटबॉटच्या माध्यमातून गरजेनुसार एडिट करण्यास सांगू शकता. फोटोमध्ये अनवॉन्टेड बॅकग्राउंट अथवा एखादा भाग हटवण्यासही सांगू शकता. मेटाने हे फीचर केवळ मेटा कनेक्ट इवेंटमध्ये सादर केले होते.

फोटोपाहून मेटाएआय उत्तर देणार
वेबफॉर्म बटण दाबून व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला मेटा एआयसोबत संवाद साधता येणार आहे. मेटाने म्हटले की, जॉन सीनासारख्या प्रसिद्ध व्यक्तीच्या आवाजातही बोलता येणार आहे. याशिवाय फोटो पाहून मेटा एआयला काय कळते हे देखील फीचर आणले जाणार आहे. जसे की, युजरने मेटा एआयला एक फोटो पाठवून त्याबद्दल विचारले असता त्याचे उत्तर मिळणार आहे. दरम्यान, मेटाने अलीकडल्या काळात युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपवर काही नवे फीचर रोलआउट केले आहेत.

 

 

आणखी वाचा : 

Amazon च्या Great Indian Festival दरम्यान 20K मध्ये खरेदी करा हे 6 फोन

E-commerce प्लॅटफॉर्मवर सेलदरम्यान फोन खरेदी करताना या 4 गोष्टींची घ्या काळजी

Share this article