अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल प्राइम मेंबर्ससाठी 26 सप्टेंबरपासूनच सुरु झाला आहे. पण सर्वसामान्यांसाठी 27 सप्टेंबरपासून सेल सुरु होणार आहे. यामध्ये 20K पर्यंतचे फोन पाहू..
रेडमी नोट 13 5G स्मार्टफोनवर सेलमध्ये धमाकेदार ऑफर्स आणि सूट देण्यात आली आहे. या फोनची मूळ किंमत 22,999 रुपये असून केवळ 17,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे.
वन प्लस कंपनीच्या नॉर्ड CE3 5G स्मार्टफोनवर नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय दिला असून फोन 16,999 रुपयांना खरेदी करता येईल. याची मूळ किंमत 26,999 रुपये आहे.
सॅमसंगच्या गॅलेक्सी एम35 5जी स्मार्टफोन अॅमेझॉनच्या सेलमध्ये 14,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. फोनचा ईएमआय केवळ 727 रुपयांपासून सुरु होणार आहे.
रिअलमीचा 26,999 रुपयांची किंमत असणारा नार्जो 70 प्रो 5G स्मार्टफोन 18,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या फोनवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट दिला जाणार आहे.
6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या सॅमसंग गॅलेक्सी 15 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची सेलमध्ये सुवर्णसंधी आहे. फोन 15,499 रुपयांत खरेदी करता येईल. याची मूळ किंमत 19,999 रुपये आहे.
108 MP चा प्रो-ग्रेड कॅमेरा, 6GB रॅम व 128GB स्टोरेजमध्ये उपलब्ध असणारा रेडमी नोट 13 5G स्मार्टफोन 20,999 रुपयांत लाँच करण्यात आला होता. सेलमध्ये फोनची किंमत 15,999 रुपये आहे.