१ ग्रॅममध्ये बनवा आकर्षक मंगळसूत्र, डिझाइन्स पाहून पडाल प्रेमात

Published : Feb 02, 2026, 03:34 PM IST

या लेखात १ ग्रॅम सोन्याच्या मंगळसूत्रांच्या विविध डिझाइन्सची माहिती दिली आहे. यामध्ये क्लासिक ब्लॅक बीड्स, मिनिमल पेंडंट, डबल लाईन, स्टोन वर्क आणि टेंपल ज्वेलरी स्टाइल यांसारख्या आकर्षक आणि ट्रेंडी पर्यायांचा समावेश आहे.

PREV
16
१ ग्रॅममध्ये बनवा आकर्षक मंगळसूत्र, डिझाइन्स पाहून पडाल प्रेमात

सोन्याचे दर वाढले असले तरी १ ग्रॅम गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र हा बजेटमधील लोकप्रिय पर्याय ठरतो. दिसायला सोन्यासारखे आणि किंमत परवडणारी त्यामुळे मागणी वाढली आहे.

26
क्लासिक ब्लॅक बीड्स डिझाईन

पारंपरिक काळ्या मण्यांची सिंगल लाईन आणि मध्ये छोटा गोल्ड पेंडंट हे सर्वात जास्त पसंत केले जाणारे डिझाईन आहे. रोजच्या वापरासाठी योग्य असं हे मंगळसूत्र आपण खरेदी करायला हवं.

36
मिनिमल पेंडंट स्टाइल

लहान हार्ट, गोल, ओव्हल किंवा फ्लॉवर पेंडंट असलेली डिझाईन्स तरुण महिलांमध्ये ट्रेंडमध्ये आहेत. हलके आणि स्टायलिश लूक देतात.

46
डबल लाईन मंगळसूत्र

दोन रांगांमध्ये काळे मणी आणि मध्ये डिझाईन पेंडंट, थोडं भरगच्च दिसणारं पण तरीही हलकं डिझाईन. सण-समारंभासाठी चांगला पर्याय.

56
स्टोन वर्क डिझाईन

व्हाइट किंवा रेड स्टोन लावलेले पेंडंट असलेले १ ग्रॅम मंगळसूत्र खूप आकर्षक दिसते. पार्टीवेअर म्हणून वापरले जाते.

66
टेंपल ज्वेलरी स्टाइल

देवमूर्ती, पान, पारंपरिक नक्षी असलेले पेंडंट, टेंपल स्टाइल डिझाईन सध्या पुन्हा ट्रेंडमध्ये आले आहे.

Read more Photos on

Recommended Stories