Wife Psychology : नवऱ्याशी सतत भांडणाऱ्या बायकोबद्दल मानसशास्त्र काय सांगतं?

Published : Dec 30, 2025, 05:13 PM IST

पती-पत्नीमध्ये भांडणं होणं सामान्य आहे. पण जेव्हा पत्नी नवऱ्याशी जास्त भांडते, तेव्हा अनेकजण तिच्या स्वभावाला दोष देतात. पण खरंच तिच्या भांडणांमागे काय कारण आहे? बायका नवऱ्याशी सतत का भांडतात? अशा बायकांबद्दल मानसशास्त्र काय सांगतं, हे जाणून घेऊयात.

PREV
16
नवऱ्याशी भांडणाऱ्या बायकांचे मानसशास्त्र -

साधारणपणे, जेव्हा एखादी पत्नी नवऱ्याशी सतत भांडते, तेव्हा 'तिचा स्वभावच तसा आहे' किंवा 'ती जुळवून घेत नाही' असं सहजपणे म्हटलं जातं. पण मानसशास्त्रानुसार, सतत भांडण्यामागे फक्त राग किंवा हट्टीपणा नसतो. अनेकदा यामागे खोल भावनिक गरजा, अनुभव आणि मानसिक ताणतणाव असू शकतो. माणसाचं वागणं हे त्याच्या आतल्या भावनिक स्थितीचा आरसा असतं, असं मानसशास्त्रज्ञ सांगतात.

26
मनातलं मिळालं नाही -

मानसशास्त्रानुसार, नवऱ्याशी जास्त वाद घालणाऱ्या पत्नीमध्ये 'इमोशनल अनफुलफिलमेंट' (भावनिक अपूर्णता) हा मुख्य घटक असतो. तिला नवऱ्याकडून समजून घेणारे शब्द, आदर, लक्ष आणि प्रेम हवं असतं. जेव्हा हे मिळत नाही, तेव्हा ती उणीव भांडणांच्या रूपात बाहेर येते. खरंतर तिला भांडण नको असतं, तर नवऱ्याने तिचं मन ओळखून घ्यावं, एवढंच हवं असतं.

36
दुर्लक्ष आणि टीका -

बालपणी किंवा पूर्वीच्या आयुष्यात दुर्लक्ष, टीका किंवा भीतीचा सामना केलेल्या मुली नात्यांमध्ये जास्त संवेदनशील असतात. मानसशास्त्रात याला 'इमोशनल ट्रिगर्स' म्हणतात. नवऱ्याने थोडंसं काही बोललं किंवा दुर्लक्ष केलं, तरी त्यांना जुन्या वेदना आठवतात आणि त्या तीव्र प्रतिक्रिया देतात.

46
अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न -

आणखी एक गोष्ट म्हणजे, ज्या महिला स्वतःला मौल्यवान समजत नाहीत किंवा घरात आपल्या भूमिकेला महत्त्व दिलं जात नाही असं वाटतं, त्यादेखील सतत भांडणांमधून आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. 'माझ्याकडेही लक्ष द्या' ही त्यांची भावना नकळतपणे नवऱ्यासोबतच्या भांडणांना कारणीभूत ठरते, असं मानसशास्त्रज्ञ सांगतात.

56
भावनिक आधार नसल्यास -

काहीवेळा तणाव हे देखील एक प्रमुख कारण असतं. घराची जबाबदारी, मुलांची काळजी, कामाचा ताण, आर्थिक समस्यांमुळे स्त्री मानसिकरित्या थकते. अशावेळी योग्य भावनिक आधार न मिळाल्यास, तो ताण नवऱ्यावर रागाच्या रूपात बाहेर पडतो. खरंतर तिचा राग नवऱ्यावर नसून परिस्थितीवर असतो. पण जवळची व्यक्ती म्हणून ती तो राग नवऱ्यावर काढते. 

66
संवादाचा अभाव -

पती-पत्नीमधील संवादाच्या अभावामुळेही काहीवेळा भांडणं होतात. ज्या स्त्रियांना आपल्या भावना शांतपणे आणि स्पष्टपणे व्यक्त करता येत नाहीत, त्या शब्दांऐवजी वादातून बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे, बायको का भांडतेय? असा विचार करण्याऐवजी, तिला काय सांगायचं आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. भांडणाऱ्या पत्नीला दोष देण्यापेक्षा तिची भावनिक स्थिती समजून घेणं गरजेचं आहे. परस्पर आदर, शांतपणे ऐकून घेण्याची वृत्ती आणि स्पष्ट संवाद असेल, तर पती-पत्नीमधील अनेक समस्या कमी होऊ शकतात.

Read more Photos on

Recommended Stories