स्वस्तात मस्त लॅपटॉपचे अनेक पर्याय, १२ हजार रुपयांमध्ये मिळणार व्हॅल्यू-फॉर-मनी क्रोमबुक

Published : Nov 23, 2025, 10:00 AM IST

तुमचे बजेट कमी आहे आणि तुम्हाला नवीन लॅपटॉप घ्यायचा आहे का? हा लेख तुम्हाला जिओबुक, लेनोवो, आसुस आणि एचपी सारख्या कमी किंमतीतील सर्वोत्तम क्रोमबुक लॅपटॉपची माहिती देतो, जे विद्यार्थी आणि साध्या कामांसाठी उत्तम पर्याय आहेत.

PREV
17
स्वस्तात मस्त लॅपटॉपचे अनेक पर्याय, १२ हजार रुपयांमध्ये मिळणार व्हॅल्यू-फॉर-मनी क्रोमबुक

आपल्याला लॅपटॉप घ्यायचाय पण बजेट कमी आहे. अशावेळी काय करायला हवं, हे समजत नाही. आपण आज अशाच कमी किंमतीतील लॅपटॉप बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

27
कमी किंमतीत क्रोमबुक लॅपटॉप करा खरेदी

कमी किंमतीमध्ये आपण क्रोमबुक लॅपटॉप खरेदी करू शकता. यावर आपण छोटे प्रोजेक्ट, साधे एडिटिंगची कामे करू शकता. विद्यार्थ्यांना कमी किंमतीमध्ये लॅपटॉप मिळण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

37
जिओबुक १३,००० रुपयांमध्ये करा खरेदी

जिओबुक आपण अगदी कमी किंमतीत म्हणजेच १२,९९० मध्ये खरेदी करू शकता. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४GB eMMC स्टोरेज येत असतं. यामध्ये वायफाय आणि सिम दोनही पर्यायांचा विचार करू शकता.

47
Lenovo Chromebook

Lenovo Chromebook हा लॅपटॉप कमी किंमतीत खरेदी करू शकता. यात इंटेल सेलेरॉन N4500 प्रोसेसर असून त्याची किंमत ₹१४,९९० आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे. यात ११.६ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

57
Primebook 2 Pro

प्राइमबुक २ प्रो हा देखील एक चांगला पर्याय असून या सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहे. या डिव्हाइसमध्ये मीडियाटेक हेलिओ जी९९ प्रोसेसर, १४.१-इंचाचा FHD IPS डिस्प्ले आहे. याची किंमत १८,९९० रुपये ठेवण्यात आली आहे.

67
Asus Chromebook

Asus Chromebook हा पण स्वस्तात मस्त खरेदी करता येण्यासारखा लॅपटॉप आहे. याची किंमत ₹१७,७७६ असून या लॅपटॉपमध्ये १४ इंचाचा डिस्प्ले, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे. हे क्रोम ओएसवर चालते. याला तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

77
HP Chromebook

तुम्ही HP Chromebook ₹१२,४८० मध्ये खरेदी करू शकता. यात ११.६-इंचाचा डिस्प्ले आहे. हे डिव्हाइस ४GB रॅम आणि ३२GB स्टोरेजसह येते. हा डिव्हाईस क्रोम ओस वर काम करतं.

Read more Photos on

Recommended Stories