कुटुंबासाठी कार खरेदी करताना अनेक पर्याय समोर येतात, ज्यामुळे गोंधळ निर्माण होतो. या लेखात रेनॉल्ट क्विड, मारुती स्विफ्ट, आणि टाटा टियागो यांसारख्या ५ बजेट-फ्रेंडली फॅमिली कार्सची माहिती दिली आहे.
पप्पा, मम्मी आणि मुलगा सगळेच बसतील एका गाडीत, 'या' फॅमिली गाड्यांचे पर्याय घ्या जाणून
आपण फॅमिलीसाठी फिरायला जाताना कोणती गाडी खरेदी करावी ते समजत नाही. अशावेळी सगळ्यांना प्रवास करता येईल आणि जाता येईल अशा गाड्यांची आपण माहिती जाणून घेऊयात.
26
Renault Kwid
जर तुम्ही ५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची फॅमिली कार शोधत असाल, तर रेनॉल्ट क्विड हा एक उत्तम पर्याय आहे. ४.९२ लाख रुपयांची सुरुवातीची किंमत, एसयूव्ही प्रकारचं डिझाईन आणि २०-२२ किमी प्रति लिटरचा मायलेज यामुळे ती लहान कुटुंबांमध्ये लोकप्रिय आहे. यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ८ इंचाचा टचस्क्रीन आणि रिअर कॅमेरा सारखी वैशिष्ट्ये असतात.
36
Maruti Swift
मारुती स्विफ्ट फॅमिली ही कार ग्राहकांमध्ये बऱ्याच काळापासून लोकप्रिय आहे. ₹५.७९ लाख पासून किंमतीची सुरुवात होत असून ही कार २२-२४ किमी प्रति लिटर मायलेज देते. नवीन मॉडेल अधिक अपडेटेड झाले आहे. ९-इंचाची स्मार्ट टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल आणि सहा एअरबॅग्ज सारख्या वैशिष्ट्यांमुळे ती एक सुरक्षित आणि आधुनिक पर्याय बनत असते.
ह्युंदाई ग्रँड आय१० NIOS ही आरामदायी आणि प्रीमियम इंटेरिअर शोधणाऱ्या कुटुंबांसाठी उपयुक्त कार आहे. किंमत ₹५.४७ लाख पासून सुरू होते आणि ती १८-२१ किमी प्रति लिटर मायलेज देते. वायरलेस चार्जर, ऑटो एसी आणि ८-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम सारख्या वैशिष्ट्यांमुळे ती वेगळी ठरत असते. सहा एअरबॅग्जसह, त्यात मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये देतात.
56
Honda Amaze
जर तुम्हाला जास्त केबिन स्पेस हवी असेल, तर होंडा अमेझ हा सुमारे ₹७ लाखांपासून सुरू होणारा एक चांगला पर्याय आहे. तिचा १८-२० किमी प्रति लिटर मायलेज आणि मोठी बूट स्पेस लांब प्रवासासाठीही ती आरामदायी आहे. तिची राइड क्वालिटी अत्यंत स्मूथ असून ड्रायव्हिंगचा अनुभव खूपच प्रीमियम वाटतो.
66
Tata Tiago
टाटा टियागो मजबूत बिल्ड क्वालिटी आणि सुरक्षिततेसाठी ओळखली जाते. ₹४.९९ लाखांची सुरुवातीची किंमत आणि प्रतिलिटर १९-२३ किमी मायलेज यामुळे ती एक चांगली कार बनत असते. यात ७-इंच टचस्क्रीन, डिजिटल कन्सोल आणि आधुनिक वैशिष्ट्ये आहेत.