टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित एसयूव्ही, टाटा सिएरा, 25 नोव्हेंबर 2025 रोजी पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक पर्यायांमध्ये लॉन्च होणार आहे. आधुनिक डिझाइन आणि ट्रिपल-स्क्रीन सेटअप, पॅनोरॅमिक सनरूफ यांसारख्या गाडीची किंमत 11 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
टाटांची नवीन कार मार्केटमध्ये, डोंगरावरून पाण्यापर्यंत कुठं पळणार; किंमत वाचून म्हणाल बुकिंग करून टाका
भारतातील आघाडीची कंपनी टाटा Sierra हि नवीन गाडी लॉंच केली आहे. हि एसयूव्ही 25 नोव्हेंबर 2025 रोजी लाँच होणार आहे. ही गाडी पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक या ३ पर्यायांमध्ये मार्केटमध्ये येणार आहे.
हेही वाचा : मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रा, किया, टेस्ला, स्कोडा, टोयोटा आदी कार कंपन्यांच्या कारची अपडेटेड माहिती जाणून घ्या. ऑटोमोबाईलच्या इतरही बातम्या वाचण्यासाठी आमच्या विशेष पेजला नक्की भेट द्या. येथे क्लिक करा..
26
गाडी लॉन्च कधी होणार?
गाडी ही २५ नोंव्हेंबर रोजी लॉन्च केली जाणार आहे. या गाडीमध्ये ट्रिपल-स्क्रीन सेटअप मिळणार आहे. यामध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि पॅसेंजर-साइड टचस्क्रीनचा समावेश आहे.
36
टाटाची लोगो असलेली स्टिअरिंग व्हील मिळणार
टाटा कंपनीची लोगो असलेली ४ स्पोक स्टिअरिंग व्हील मिळणार आहे. या गाडीची स्क्रीन हि १२.३ इंच लांबीची असणार आहे. यामध्ये ड्युअल टोन केबल थीम असणार आहे.
गाडीमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. टाटाने सिएरामध्ये ऑटो-डिमिंग IRVM, 360 डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, वायरलेस फोन चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग आणि इतरही अनेक खास फीचर्स मिळतात.
56
गाडीची डिझाईन कशी आहे?
गाडीची डिझाईन हि आधुनिक आणि मजबूत आहे. या गाडीमध्ये फ्रंट ग्रिल, स्लिमर आणि स्प्लिट हेडलॅम्प सेटअप, स्मॉल फ्रंट आणि रियर ओव्हरहॅंग्स, स्क्वेअर व्हील आर्च, 19-इंच अलॉय व्हील्स, रूफलाइन मिळते. यामुळे एसयुव्हीचा लूक खूप खास मिळतो.
66
गाडीची किंमत किती असणार?
या गाडीची किंमत हि ११ लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. टॉप-एंड आयसीई ट्रिमची किंमत सुमारे 20 लाख रूपये असू शकते. तसेच टाटा सिएरा ईव्हीची किंमत 20 लाख ते 25 लाख रूपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.