स्विफ्टला टक्कर द्यायला मार्केटमध्ये आली 'ही' गाडी, किंमत वाचून म्हणाल स्वस्तात मिळणार सेफ गाडी

Published : Nov 17, 2025, 10:00 AM IST

टाटा टियागो NRG ही मारुती स्विफ्टला टक्कर देण्यासाठी बाजारात आली आहे. ही गाडी दमदार मायलेज, सुरक्षितता आणि प्रीमियम इंटेरिअरसह येते, ज्यामुळे तिला 'क्रॉस-हॅचबॅक' म्हणून एक वेगळी ओळख मिळाली आहे.

PREV
16
स्विफ्टला टक्कर द्यायला मार्केटमध्ये आली 'हि' गाडी, किंमत वाचून म्हणाल स्वस्तात मिळणार सेफ गाडी

टाटा नॅनो गाडी आली त्यावेळी ती ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यानंतर आता टाटा त्या तोडीची टाटा टियागो गाडी मार्केटमध्ये आली आहे. आपण या गादीबद्दलची माहिती जाणून घेऊयात.

26
मारुती स्विफ्टपेक्षा टाटांची गाडी दमदार

मारुती स्विफ्टपेक्षा टाटांची टियागो ही गाडी दमदार असल्याचं दिसून आलं आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत किंमत ₹ ७.३० लाख ते ₹ ८.८५ लाख इतकी पडते. प्रत्येक शहरानुसार या किंमतीत बदल होऊ शकतो.

36
टियागो गाडी देते मजबूत मायलेज

टाटा टियागो हि गाडी पेट्रोल: सुमारे $२०.०९ \text{ किमी/लीटर} आणि सीएनजी: सुमारे $२६.४९ \text{ किमी/किलो}$ मायलेज देत असते. ताटाची गाडी सुरक्षित असून आपण या गाडीत सुरक्षित प्रवास सहजपणे करू शकता.

46
टियागोमध्ये स्विफ्टपेक्षा काय आहे वेगळं?

टियागो गाडी स्विफ्टपेक्षा वेगळी असून त्यामध्ये नेमकं काय वेगळं आहे ते आपण जाणून घेऊयात. टाटाने टियागो एनआरजीला (NRG म्हणजे Naturally Rough and Going) ‘क्रॉस-हॅचबॅक’ बनवले आहे, ज्यामुळे तिचा लूक पारंपारिक हॅचबॅक असलेल्या मारुती स्विफ्टपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.

56
इंटेरिअरमध्ये काय केले बदल?

या गाडीच्या इंटेरिअरमध्ये बदल करण्यात आला आहे. केबिन आता प्रीमियम आणि अपडेट झाल्याचं दिसून आलं आहे. गाडीच्या केबिनमध्ये मोठी स्क्रीन दिली असून त्यामुळं गाडीत बसल्यानंतर एक फील जाणवत राहतो.

66
टाटा टियागो गाडी बाकीच्यांपेक्षा वेगळी कशी?

टाटा टियागो ही गाडी बाकीच्या गाड्यांपेक्षा वेगळी असल्याचं दिसून आलं आहे. ती एसयूव्हीसारखे डिझाइन घटक आणि प्रगत तंत्रज्ञान असलेली एक रगडेड् क्रॉस-हॅचबॅक बनली आहे.

Read more Photos on

Recommended Stories